पौराणिक कथेनुसार, द्वापर युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे या दिवशी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री बाळ श्रीकृष्णाच्या जन्मानंतर विधीवत पूजा करतात. हा सण संपूर्ण जगभरात मोठ्या हर्ष-उल्हासात साजरा करतात.
श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी जर प्रत्येक राशीच्या लोकांनी आपल्या राशीनुसार भगवान श्रीकृष्णाची सजावट केली तर भगवान श्रीकृष्णासोबतच राशीचा स्वामी आणि ग्रह नक्षत्रही तुम्हाला अनुकूल आशीर्वाद देतील. असे केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतील आणि भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद सदैव राहील. कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर तुम्ही राशीनुसार बाळकृष्णाची तयारी केल्यास तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात आणि ग्रहांचेही शुभ परिणाम लाभ देतील.
मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे, त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी बाळकृष्णाला लाल रंगाचे कपडे परिधान करावेत आणि इतर सजावट करतांना देखील शक्यतो लाल रंगाचा वापर करावा.
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला चमकदार पांढरे कपडे घालावेत आणि सजावटीमध्ये देखील शक्यतो पांढरा रंग वापरावा.
मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, बुधाला हिरवा रंग आवडतो, म्हणून भगवान श्रीकृष्णाला हिरवे कपडे घालावेत आणि घरी जी सजावट कराल त्यामध्ये देखील शक्यतो हिरवा रंग वापरावा.
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत आणि इतर सजावटीमध्ये जास्तीत जास्त पांढरा रंग वापरावा.
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला लाल आणि गुलाबी रंगाचा श्रृंगार करावा आणि इतर सजावटीमध्ये देखील शक्यतो लाल किंवा गुलाबी रंग वापरावा.
कन्या राशीचा स्वामी बुध आहे, त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला हिरवे वस्त्र परिधान करावे आणि इतर श्रृंगारामध्ये पण हिरवा रंगाचा वापर करावा.
शुक्र हा तूळ राशीचा स्वामी आहे, त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला शुभ्र वस्त्रांनी सजवावे.
मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामी आहे, त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी बाळकृष्णाच्या श्रृंगारात लाल रंगाचा वापर करावा.
धनु राशीचा स्वामी बृहस्पति आहे, त्यामुळे धनु राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत आणि घरातील इतर सजावट मध्ये देखील शक्यतो लाल रंगाचा वापर करावा.
शनि हा मकर राशीचा स्वामी आहे, त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला काळे कपडे घालायला हवेत आणि घराच्या झांकीमध्ये जास्तीत जास्त काळा रंग वापरावा.
कुंभ राशीचा स्वामी शनि आहे, त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला काळ्या रंगाच्या वस्त्रांनी सजवावे.
बृहस्पति हा मीन राशीचा स्वामी आहे, म्हणून मीन राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला पिवळ्या वस्त्रांनी सजवावे.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.