भगवान शिवाला प्रिय असलेला श्रावण महिना हा अतिशय शुभ महिना मानला जातो. श्रावण महिन्यात वास्तुशी संबंधित काही उपाय केल्याने कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो. या महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वतीची प्रामाणिक मनोभावे पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. वास्तूमध्ये सांगितलेले हे उपाय श्रावण महिन्यात केल्यास आरोग्य, कामाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक जीवनात सुखद परिणाम मिळतात. चला तर या उपायांबद्दल जाणून घेऊया.
श्रावण महिन्यात करायचे उपाय
श्रावण महिन्यात रोज घरामध्ये गंगाजलाची फवारणी करावी. श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करणे अतिशय शुभ मानले जाते. श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण केल्याने सौभाग्य प्राप्त होते. श्रावण महिन्यात घरामध्ये तुळशीचे रोप लावावे. तुळशीचे रोप उत्तर दिशेला लावा. श्रावण महिन्यात देवाच्या अर्धनारीनटेश्वर रूपाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम वाढते. त्यामुळे नवविवाहितांनी हा उपाय जरूर करावा.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवाचे स्मरण करून विधीवत व्रत करा.श्रावण महिन्यात तामसिक भोजनापासून दूर राहावं. ज्यांना शारिरीक व्याधी असतील अशा लोकांनी या महिन्यात दररोज शिवलिंगावर देशी तूप मिसळून अर्पण करावं. असे केल्याने त्या व्यक्तींची शारीरिक व्याधी दूर होते. श्रावण महिन्यात दानाचं महत्व खूप आहे. श्रावण महिन्यात गहू दान केल्याने कुटुंबात वृद्धी होते आणि कुटुंबात प्रेम टिकून राहते. श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराला वस्त्रे अर्पण करा.त्याची मनोभावे पूजा करा.
कपड्याच्या वर अक्षता ठेवून अर्पण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. भगवान शिवाला प्रसन्न करायचं असेल तर भगवान शिवाला गंगाजलाने अभिषेक करा. असे केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात. श्रावण महिन्यातील सोमवारी घराच्या ईशान्य कोपर्यात रुद्राभिषेक करावा. ध्यान धारणा करावी आणि मांसाहार वर्ज्य करावं.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या.)
संबंधित बातम्या