Shiv Yog : चित्रा नक्षत्रातील 'शिव योग' ठरणार अत्यंत शुभ! 'या' राशींचे उजळणार नशीब, येणार श्रीमंती
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Shiv Yog : चित्रा नक्षत्रातील 'शिव योग' ठरणार अत्यंत शुभ! 'या' राशींचे उजळणार नशीब, येणार श्रीमंती

Shiv Yog : चित्रा नक्षत्रातील 'शिव योग' ठरणार अत्यंत शुभ! 'या' राशींचे उजळणार नशीब, येणार श्रीमंती

Published Jul 14, 2024 11:42 AM IST

Shiv Yog : आज रविवार १४ जुलै २०२४ रोजी चंद्र कन्या राशीतून निघून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राच्या या गोचरमधून आज विविध योगांची निर्मिती होत आहे.

शिव योग
शिव योग

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचर करण्याचा एक निश्चित काळ असतो. या ठराविक वेळेतच ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. या नवग्रहांमध्ये चंद्र एक असा ग्रह आहे जो भ्रमण करण्यासाठी सर्वात कमी वेळ घेतो. चंद्र एक ते दीड दिवसात आपली राशी बदलत असतो. त्यामुळे दररोज चंद्राच्या भ्रमणातून विविध योगांची निर्मिती होत असते. आज रविवार १४ जुलै २०२४ रोजी चंद्र कन्या राशीतून निघून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राच्या या गोचरमधून आज विविध योगांची निर्मिती होत आहे. आज चंद्र भ्रमणातून शिव योग, सिद्ध योग आणि रवि योग घटित होत आहे. शिवाय आज चित्र नक्षत्र आहे. या नक्षत्रात जुळून आलेला शिव योग काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. त्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

वृषभ

चित्रा नक्षत्रात घटित होत असलेला शिव योग वृषभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आयुष्यात असलेली नाराजी, अडचणी आणि नाकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होईल. तुमच्यामध्ये एक नवीन आत्मविश्वास आणि ऊर्जा निर्माण होईल. पतिपत्नी, भावंडांमधील मतभेद दूर होतील. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. अचानक धनलाभ होईल. व्यापाऱ्यांना आर्थिक नफा होईल. आईवडिलांसोबत धार्मिक कार्यांमध्ये सहभाग घ्याल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना आज शिव योगाचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. हातात घेतलेल्या प्रत्येक कार्यात आज यश मिळेल. मनासारख्या गोष्टी घडत असल्याने समाधान लाभेल. घरातील सुखसमृद्धीत वाढ होईल. आर्थिक चणचण दूर होईल. पैशांची आवक वाढल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात तुमच्या नव्या योजना सफल होतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. एखाद्या प्रकारच्या कर्जासाठी प्रयत्न करत असाल तर आज तुम्हाला कर्ज मिळून जाईल. जोडीदारासोबत रोमँटिक डिनर डेट प्लॅन कराल. जोडीदारासोबत भविष्यात लग्नाच्यादृष्टिकोनातून चर्चा कराल.

कन्या

आज चित्रा नक्षत्रातील शिव योगात कन्या राशीच्या लोकांना लाभ मिळणार आहे. आज प्रियजनांच्या मदतीने घरातील महत्वाची कामे पार पाडण्यात यश येईल. आज आर्थिक देवाणघेवाण करावी लागेल. त्याचा दुप्पट फायदा तुम्हाला येत्या काळात दिसून येईल. त्यातून तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत चांगल्या संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे विशेष कौतुक होईल. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या आरोग्याच्या तक्रारी संपुष्ठात येतील. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.

कुंभ

आज शिव योगाचा लाभ कुंभ राशीच्या लोकांना मिळणार आहे. याकाळात तुम्हाला कमाईचे विविध मार्ग सापडतील. आर्थिक आवक वाढेल. त्यामुळे घरातील सुख सुविधांमध्ये वाढ होईल. घरातील वातावरण आनंदमय असेल. वाहन किंवा घर खरेदीची इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. सामाजिक कार्यांमध्ये आनंदाने सहभाग घ्याल. त्यातून मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. व्यापाऱ्यांना व्यापारातून धनलाभ होईल. नोकरीत पदोन्नती किंवा बढती मिळेल. पतिपत्नीच्या नात्यात गोडवा येईल. जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवाल.

Whats_app_banner