Two Rajyog : तब्बल ३० वर्षानंतर जुळून येताय 'हे' राजयोग! ३ राशींना येणार सोन्यासारखे दिवस
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Two Rajyog : तब्बल ३० वर्षानंतर जुळून येताय 'हे' राजयोग! ३ राशींना येणार सोन्यासारखे दिवस

Two Rajyog : तब्बल ३० वर्षानंतर जुळून येताय 'हे' राजयोग! ३ राशींना येणार सोन्यासारखे दिवस

Jun 08, 2024 01:43 PM IST

Two Rajyog : ग्रह आणि नक्षत्राच्या संक्रमणातून अनेक शुभ-अशुभ योग जुळून येत असतात. या योगांचा परिणाम बाराही राशींवर पडत असतो. ३० वर्षानंतर जुळून येणाऱ्या २ राजयोगाचा कोणत्या राशींना फायदा होईल जाणून घ्या.

शशी आणि बुधादित्य राजयोग
शशी आणि बुधादित्य राजयोग

ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या कुंभ राशीत भ्रमण करत आहे. तसेच गेल्या महिन्यात म्हणजेच 31 मे रोजी बुध ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे 30 वर्षांनंतर शश आणि बुधादित्य राजयोग निर्माण होत आहे. या राजयोगाचा प्रभाव बाराही राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. यामध्ये काहींवर सकारात्मक तर काहींवर नकारात्मक प्रभाव पडेल.

जोतिष शास्त्रानुसार एक ठराविक कालावधी पूर्ण झाल्यानंतर नऊही ग्रह आपली राशी बदलत असतात. ज्यावेळी ग्रहाची राशी बदलते तेव्हा त्यातून शुभ आणि अशुभ राजयोगही निर्माण होतो. बुध ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केल्याने शश आणि बुधादित्य योग जुळून आला आहे. या राजयोगामुळे काही राशींचे नशीब पालटणार आहे. यामध्ये अशा तीन राशी आहेत ज्यांच्यावर या राजयोगाचा अत्यंत शुभ प्रभाव पडणार आहे. त्या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

वृश्चिक

जोतिषशास्त्रानुसार तब्बल ३० वर्षांनंतर जुळून आलेल्या शश आणि बुधादित्य राजयोगाचा मोठा फायदा वृश्चिक राशीला होणार आहे. वृश्चिक ही राशीचक्रातील आठच्या क्रमांकांची राशी आहे. या राजयोगात वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येणार आहेत. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. राजकारणाशी संबंधित लोकांना उत्तम यश मिळेल. विवाहित लोकांचे वैवाहिक आयुष्य आनंदी आणि भरभराटीचे राहील. या लोकांनी हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. त्यामुळे मन प्रसन्न असेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे असणार आहे.

वृषभ

शश आणि बुधादित्य योग वृषभ राशीच्या लोकांसाठीसुद्धा अत्यंत फलदायी असणार आहे. व्यवसायिकांना व्यवयात आर्थिक लाभ होतील. त्यामुळे व्यापार वेगाने विस्तारेल. कमाईचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा उत्तम होईल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. याकाळात आनंदाच्या बातम्या कानावर पडू शकतात. शिवाय कामानिमित्त परदेशी जाण्याचा योगसुद्धा जुळून येईल. त्यातूनही लाभच होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

कुंभ

३० वर्षानंतर जुळून आलेल्या शश आणि बुधादित्य योगाचा फायदा कुंभ राशीलासुद्धा मिळणार आहे. याकाळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश पदरात पडेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुपटीने वाढेल. करिअरमध्ये नव्या संधी उपलब्ध होतील. त्यातून लाभ होऊन वेगाने प्रगती होईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. त्यातून पगारवाढ किंवा बढती मिळू शकते. कार्यक्षेत्रात नावलौकीक वाढेल. अनपेक्षितपणे धनलाभ झाल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. घरातील वातावरण उल्हसित राहील. धार्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल. आणि मनशांती लाभेल.

Whats_app_banner