Shani Vakri : शनी वक्रीतून निर्माण झाला दुर्मिळ राजयोग! चांगल्या पगाराची नोकरी ते वडिलोपार्जित संपत्ती, होणार लाभ
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Shani Vakri : शनी वक्रीतून निर्माण झाला दुर्मिळ राजयोग! चांगल्या पगाराची नोकरी ते वडिलोपार्जित संपत्ती, होणार लाभ

Shani Vakri : शनी वक्रीतून निर्माण झाला दुर्मिळ राजयोग! चांगल्या पगाराची नोकरी ते वडिलोपार्जित संपत्ती, होणार लाभ

Jul 03, 2024 02:17 PM IST

Shani Vakri Created Shash Rajyog : शनीच्या वक्री चालीतून शश नावाचा दुर्मिळ राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगाचा फायदा कोणत्या राशींना होणार जाणून घेऊया.

शनि वक्रीचा राशींवर शुभ प्रभाव
शनि वक्रीचा राशींवर शुभ प्रभाव

वैदिकशास्त्रानुसार अवकाशात नऊ ग्रह कार्यरत असतात. या नवग्रहातील प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्व आहे. त्यानुसार शनिदेवालासुद्धा शास्त्रात एक अनन्यसाधारण स्थान आहे. शास्त्रानुसार शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळे देत असल्याची मान्यता आहे. शनिदेव चांगल्या कर्माची चांगली फळे देतात. तर वाईट कर्म करणाऱ्यांवर शनिदेव प्रकोप करतात अशी मान्यता आहे. शनिदेवाची आराधना करण्याचे काही महत्वाचे नियम शास्त्रात सांगण्यात आले आहेत. शिवाय असे म्हटले जाते की, ज्या लोकांवर शनिदेवाचा प्रकोप होतो त्यांचे वाईट दिवस सुरु होतात. याउलट काही लोकांना शनिदेवाची कृपादृष्टी लाभते. त्या लोकांचे मात्र नशीबच उजळून निघते. सध्या शनिदेव आपली वक्री चाल चालत आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर आपली चाल मार्गी किंवा वक्री करत असतात. अनेकांना वक्री चाल म्हणजे नेमके काय याबाबत माहिती नसेल. तर जेव्हा एखादा ग्रह उलट दिशेने प्रवास करतो तेव्हा तो आपली चाल वक्री करतो असे म्हटले जाते . ग्रहांच्या या वक्री चालीने अनेक राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतात. परंतु काहीवेळा काही राशींना या वक्री चालीतून प्रचंड लाभ होतो. गेल्या महिन्यात म्हणजेच २९ जून २०२४ रोजी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी शनिदेवाने आपली वक्री चाल चालायला सुरुवात केली आहे. शनिदेव कुंभ राशीतून वक्री झाले आहेत. तसेच तब्बल साडे चार महिने शनिदेव वक्री होणार आहेत. येत्या १५ नोव्हेंबर २०२४ रोजी शनिदेव पुन्हा मार्गी होतील. शनीच्या वक्री चालीतून शश नावाचा दुर्मिळ राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगाचा फायदा कोणत्या राशींना होणार जाणून घेऊया.

वृषभ

शनी वक्रीतून निर्माण झालेल्या शश राजयोगाचा फायदा वृषभ राशीला होणार आहे. याकाळात अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची महत्वाची कामे पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. नोकरदारवर्गावर वरिष्ठ खुश होतील. त्यातून पगारवाढ, पदोन्नती होऊन एखादी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत मनासारखे यश मिळेल. उद्योग-व्यापारात मोठा आर्थिक लाभ होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.

कुंभ

शश राजयोगात व्यापारात अडलेली कामे अचानक पूर्ण होतील. काही सरकारी सवलती मिळायच्या असतील तर त्या मिळून जातील. व्यवसायात गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी खास योजना आखाल. वरिष्ठांची मर्जी प्राप्त झाल्याने प्रमोशन मिळू शकते. विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. आर्थिक परिस्थिती सुधारल्याने राहणीमान उंचावेल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. याकाळात सार्वजनिक कार्यात पदप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. करिअरमध्ये नवनविन संधी तुम्हाला मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास मोठे व्यासपीठ मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. याकाळात आर्थिक गुंतवणूक केल्यास फायदा होईल.

वृश्चिक

शनी वक्रीतून निर्माण झालेल्या शश राजयोगाचा फायदा वृश्चिक राशीच्या लोकांनासुद्धा होणार आहे. याकाळात तुम्हाला अनपेक्षित मार्गाने धनलाभ होतील. आर्थिक आवक वाढल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीत हक्क मिळेल. याकाळात आर्थिक गुंतवणूक केल्यास विशेष लाभ होईल. बेरोजगारांना नोकरी मिळण्याचा योग आहे. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनमोकळा संवाद होऊन नाते अधिक दृढ होईल. घरातील वातावरण आनंदी राहील.

Whats_app_banner