Shani Vakri Shash Raj Yog: वैदिक शास्त्रानुसार कुंडलीच्या संपूर्ण अभ्यासात शनिच्या स्थानाला विशेष महत्व असते. शनिदेवाला न्यायाधिपती आणि कर्मानुसार फळ देणारा देवता मानले जाते. नऊ ग्रहांमध्ये शनि सर्वात संथ गतीने भ्रमण करणारा ग्रह समजला जातो. शनि एकाच राशीत जवळपास अडीच वर्षे विराजमान असतात. अशात शनिला राशीचक्राचा एक फेरा पूर्ण करण्यासाठी जवळपास ३० वर्षांचा कालावधी लागतो. शास्त्रानुसार शनिदेव कर्मानुसार फळे देत असतात. त्यामुळे चांगल्या कर्माची चांगली फळे देतात. तर वाईट कर्म करणाऱ्यांवर ते प्रचंड क्रोधीत होतात. आणि त्यांच्यावर आपला अशुभ प्रभाव टाकतात. त्यामुळे शनिदेवाला सर्वच घाबरून असतात.
३० जूनपासून शनिची वक्री प्रारंभ झाली आहे. अर्थातच शनिदेव राशींमध्ये उलट दिशेने प्रवास करत आहेत. शनीची वक्री येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. याकाळात अनेक शुभ-अशुभ योग निर्माण होणार आहेत. शनि वक्रीचा अनेक राशींवर नकारात्मक प्रभाव पडत आहे. या राशींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे काही राशी अशा आहेत ज्यांना शनि वक्रीचा शुभ लाभ मिळत आहे. शनि आपली मूळ त्रिकोण राशी कुंभमध्ये वक्री झाल्याने 'शश राजयोग' निर्माण होत आहे. या राजयोगाचा फायदा काही राशींना मिळणार आहे. पाहूया या राशी नेमक्या कोणत्या आहेत.
शनि वक्रीतून निर्माण झालेल्या शश राजयोगाचा लाभ वृषभ राशीच्या लोकांना मिळणार आहे. याकाळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे निश्चितच पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना प्रतिष्ठित ठिकाणी नोकरी मिळेल. उद्योग-व्यापारात आर्थिक फायदा होईल. विविध मार्गाने धनलाभ होतील. अनपेक्षितपणे पैसे मिळाल्याने मन उत्साही राहील. नोकरदार वर्गाच्या कामात वेग येईल. नोकरीत विविध संधी प्राप्त होतील.
वृश्चिक राशीच्या लोकांना शश राजयोगाचा प्रचंड फायदा होणार आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. आकस्मिक धनलाभ होतील. त्यामुळे आर्थिक चणचण दूर होईल. पैशांची आवक वाढल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. कार्यक्षेत्रात वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. तुमच्या कामावर प्रभावित होऊन तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. जमीन किंवा घर खरेदी करण्याचा शुभ योग जुळून येत आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. जोडीदारासोबत संबंध मजबूत होतील.
शश राजयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. याकाळात आयात-निर्यातीच्या व्यवसायात मोठा आर्थिक नफा मिळेल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अगदी उत्तम आहे. तुमच्या पगारात वाढ होईल. आर्थिक आवक वाढल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. विविध गोष्टींमधून लाभ मिळतील. मनासारख्या गोष्टी घडत असलयाने मन उत्साही राहील. या गोचरमध्ये स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यावर भर द्याल. शिवाय त्यादृष्टीने काही महत्वाचे आणि सकारात्मक निर्णय ठामपणे घ्याल.