शनी देवाला जोतिषशास्त्रात प्रचंड महत्व आहे. शनी देवाच्या शुभ प्रभावाने अगदी खचलेले लोकसुद्धा नव्या उमेदीने उठून उभे राहतात. तर त्यांच्या अशुभ प्रभावाने चांगल्या कामातसुद्धा विघ्न येऊ शकतात. त्यामुळे शनी देवाची शुभ कृपा असणे सर्वांनाच आवश्यक वाटते. येत्या काही दिवसांत शनी अनेक राशींवर शनी देव शुभ कृपादृष्टी पाडणार आहेत. या दिवसांमध्ये शनी उलट चालीने संक्रमण करणार आहेत. हे संक्रमण अतिशय शुभ असणार आहे. आणि याचा विशेष फायदा राशिचक्रातील राशींना होणार आहे. जोतिष अभ्यासानुसार शनी देव या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत उलट्या चालीने प्रवास करणार आहेत. हा काळ काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. पाहूया त्या नशीबवान राशी कोणत्या आहे.
शनी देव लवकरच आपली चाल बदलत उलट दिशेने प्रवास करणार आहेत. येत्या जून महिन्यात शनी चाल बदलत कुंभ राशीत उलट प्रवास करणार आहेत. जून महिन्यापासून येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत शनी देवाचा उलट प्रवास चालू राहणार आहे. म्हणजेच तब्बल १३९ दिवस शनी देवाची उलटी चाल असणार आहे. शनी देवाची वक्री यंदा काही राशींसाठी अतिशय शुभ लाभ देणारी ठरणार आहे
मेष राशी ही शनी देवाची शुभ कृपा प्राप्त करणारी पहिली राशी आहे. जोतिष अभ्यासानुसार शनी देवाच्या वक्री चालीचा सकारात्मक प्रभाव मेष राशीवरसुद्धा पडणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. व्यापारात फायदाच-फायदा झालेला पाहायला मिळेल. त्यामुळे आत्मविश्वसात वाढ होईल. मानसिक समाधान लाभेल. नोकरदारवर्गाला नोकरीच्या नव्या संधी मिळतील. सुखद घटना घडत असल्यामुळे घरातील वातावरण अगदी प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून बचत करण्यातसुद्धा यशस्वी व्हाल.
शनी देवाच्या उलट चालीने वृश्चिक राशीच्या लोकांनासुद्धा अफाट फायदा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी पदप्रतिष्ठा वाढून पगारवाढ होऊ शकते. अनपेक्षित मार्गाने धनलाभ होईल. त्यामुळे चकित आणि आनंदी अशी व्दिदा मनस्थिती होईल. लव लाईफ अगदी सुरळीत राहणार आहे. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होऊन प्रेम वाढणार आहे. करिअरसुद्धा प्रगती पथावर असणार आहे.
लवकरच होणाऱ्या शनी देवाच्या उलट चालीचा उत्तम प्रभाव वृषभ राशीच्या लोकांवरसुद्धा पडणार आहे. आयुष्यात एकापाठोपाठ एक येत असलेल्या अडचणी याकाळात आपोआप संपुष्ठात येतील. समस्यांचे निराकरण झाल्याने मन आनंदी होईल. विवाहित लोकांना मुलांच्याकडून समाधानकारक बातम्या ऐकायला मिळतील. आरोग्याविषयी समस्या दूर होऊन तब्येत उत्तम राहणार आहे. हातात पैसा येऊन आर्थिक स्थितीसुद्धा स्थिर राहणार आहे.