ज्योतिष शास्त्रात प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्व आहे. त्यानुसार शनिदेवालासुद्धा शास्त्रात एक अनन्यसाधारण स्थान आहे. शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळे देत असल्याचे म्हटले जाते. त्याप्रमाणे चांगल्या कर्माची चांगली फळे मिळतात. तर वाईट कर्म करणाऱ्यांवर शनिदेव क्रोधीत होतात अशी मान्यता आहे. शास्त्रामध्ये शनिदेवाची आराधना करण्याचे काही महत्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. शिवाय असे म्हटले जाते की, ज्या लोकांवर शनिदेवाचा प्रकोप होतो त्यांचे वाईट दिवस सुरु होतात. याउलट काही लोकांना शनिदेवाची कृपादृष्टी लाभते. त्या लोकांचे मात्र भाग्य उघडते.
ज्योतिषअभ्यासानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली चाल मार्गी किंवा वक्री करत असतात. अनेकांना वक्री चाल म्हणजे नेमके काय असा प्रश्न पडला असेल. तर जेव्हा एखादा ग्रह आपली चाल वक्री करतो म्हणजे उलट दिशेने प्रवास करतो. ग्रहांच्या या वक्री चालीने अनेक राशींना नुकसान सहन करावा लागतो. मात्र प्रत्येक वक्री अशुभच असते असे नाही काहीवेळा काही राशींना या वक्री चालीतून अफाट फायदा होतो. दरम्यान येत्या २९ जून २०२४ रोजी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी शनिदेव आपली वक्री चाल चालणार आहेत. शनिदेव कुंभ राशीतून वक्री होणार आहेत. तसेच तब्बल साडे चार महिने शनिदेव वक्री होणार आहेत. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी शनिदेव पुन्हा मार्गी होतील.
शनिदेवाच्या वक्री चालीचा प्रभाव नेहमीच अशुभ असतो असे नाही. काही राशींसाठी शनिदेवाची वक्री चाल लाभदायक असते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदेव शुभ स्थानांत असतील तर त्यांना अजिबात चिंता करण्याची गरज नाही. तसेच ज्या लोकांवर साडेसातीचा किंवा शनि महादशेचा त्रास सुरु आहे त्यांना शनिदेवाच्या वक्रीचा अधिक त्रास होतो. परंतु ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार योग्य ते उपाय केल्याने शनिदेवाचा क्रोध काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
शनि विक्रीच्या काळात ज्या राशीमध्ये शनिदेव शत्रू स्थानात विराजमान आहेत त्यांनी नदीमध्ये स्नान करावे आणि छत्रीचे दान करावे. तसेच लोखंडी वाटीत मोहरीचे तेल घेऊन स्वतःचे प्रतिबिंब त्यात पाहावे आणि ती वाटी दान करावी किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेऊन द्यावी. शास्त्रानुसार शनि वक्रीच्या काळात लोखंड, मोहरीचे तेल, काळे वस्त्र, काळी उडीद डाळ, काळी तीळ, घोंगडी इत्यादी गोष्टी दान करणे अत्यंत शुभ समजले जाते. याकाळात तुम्ही हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड यांचे वाचन करु शकता.
वैदिक शास्त्रानुसार शनिदेव अत्यंत न्यायप्रिय देवता आहेत. शनिदेव चांगल्या कर्माची चांगली आणि वाईट कर्माची वाईट फळे देतात. त्यामुळे शनि वक्रीच्या काळात वाईट कर्म, लोभ, लालसा या गोष्टी करणे टाळा. तसेच गरीब, कामगार, वृद्ध, आजारी लोकांना त्रास देऊ नका. किंवा त्यांचा कोणत्याही प्रकारे अपमान करणे टाळा. याकाळात आपल्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवा. इतरांना अपशब्द बोलणे आवर्जून टाळा. शनि वक्रीच्या काळात आईवडील, देवीदेवता, पशु पक्षी यांचा अपमान करु नये.
संबंधित बातम्या