हिंदू धर्मात शनिदेवाला प्रचंड महत्व आहे. शनिदेवाला कर्मांची फळे देणारा देवता म्हणूनही संबोधले जाते. वैदिक शास्त्रानुसार आपल्या चांगल्या-वाईट कर्मानुसार शनिदेव त्याची फळे आपल्याला देत असतात. शनि देवसुद्धा इतर सर्व ग्रहांप्रमाणे उदय आणि अस्त होत असतात. शनिदेव कधी सरळ चालीने चालतात तर कधी वक्री म्हणजेच उलट चालीने चालतात. शनि ग्रहाच्या हा हालचालींचा राशी चक्रातील बाराही राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडत असतो. बहुतांश वेळा शनिची वक्री चाल अशुभ समजली जाते. मात्र यंदा शनिची वक्री चाल काही राशींसाठी मात्र वरदान ठरणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार शनिच्या राशी परिवर्तनामुळे विविध घडामोडी घडून येतात. एकदा एक राशी सोडल्यानंतर पुन्हा त्याच राशीत परत यायला शनि देवाला एकदोन नव्हे तर ३० वर्षांचा कालावधी लागतो. सध्या शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. मात्र येत्या २९ जूनपासून शनि आपली वक्री चाल अर्थातच उलट दिशेने प्रवास करणार आहेत. तब्बल ४ महिने म्हणजे नोव्हेंबरपर्यंत शनि कुंभ राशीत वक्रि चाल चालणार आहे. शनिच्या या वक्री चालीचा शुभ प्रभाव ३ राशींवर पडणार आहे.
शनिदेवाच्या वक्री चालीचा अत्यंत शुभ प्रभाव कन्या राशीवर पडणार आहे. शनीदेवाच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. शनि वक्रीच्या या चार महिन्यांच्या काळात नकारात्मक प्रभाव टाकणारे ग्रह कमजोर असतील. त्यामुळे शुभ लाभ देणाऱ्या ग्रहांचा प्रभाव वाढून लाभ होणार आहे. विद्यार्थी किंवा शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्यांना विशेष फायदा होणार आहे. उद्योग-व्यवसायात चांगला फायदा होऊन धनलाभ होणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीसुद्धा सुधारेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. घरातील वातावरण आनंदी असणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनेल. याकाळात आरोग्य उत्तम राहील.
शनिच्या वक्री चालीचा फायदा तूळ राशीलासुद्धा होणार आहे. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे याकाळात पूर्ण होतील. त्यामुळे मनावरचा ताण नाहीसा होईल. मन आनंदी आणि उत्साही राहील. सामाजिक कार्यात आवर्जून सहभाग घ्याल. त्यामुळे सामाजिक मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमचा स्वभाव आणि प्रभावी व्यक्तिमत्वमुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. याकाळात आयुष्यात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होईल. व्यवसायिकांना व्यवसायात गती प्राप्त होईल. या चार महिन्यांच्या काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास आर्थिक लाभ चांगला होईल. कुटुंबासोबत संबंध आणखी दृढ होतील. जोडीदाराचा चांगला सहवास लाभेल.
यंदाच्या शनि वक्रीचा सकारत्मक प्रभाव वृश्चिक राशीवरसुद्धा पडणार आहे. २९ जूनपासून १५ नोव्हेंबरपर्यंत कुंभ राशीत विराजमान होऊन शनिदेव तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतील. त्यामुळे पैशांची चणचण दूर होईल. तुमच्यासाठी कमाईचे नवे मार्ग खुले होतील. धनलाभाने घरातील भौतिक सुविधांमध्ये वाढ होईल. भागीदारीत एखादा व्यवसाय सुरु करण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. नोकरीमध्ये अतिशय वेगाने प्रगती होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. यातूनच बढती किंवा पगारवाढ मिळू शकते. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.