Shani Dev Gochar : शनिदेव कधी होणार मार्गी? 'या' ५ राशींना मिळणार शनिदोषातून मुक्ती
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Shani Dev Gochar : शनिदेव कधी होणार मार्गी? 'या' ५ राशींना मिळणार शनिदोषातून मुक्ती

Shani Dev Gochar : शनिदेव कधी होणार मार्गी? 'या' ५ राशींना मिळणार शनिदोषातून मुक्ती

Jul 11, 2024 08:58 AM IST

Shani Dev Gochar 2024 : शनिदेव ज्या राशीवर अशुभ प्रभाव टाकतात त्या राशींना प्रत्येक गोष्टीत अडचणी येतात. महत्वाची कामे रखडतात. आर्थिक चणचण भासते.

शनिदेवाच्या अशुभ प्रभावातून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय
शनिदेवाच्या अशुभ प्रभावातून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या मार्गी आणि वक्री होण्याला प्रचंड महत्व आहे. ग्रह ज्यावेळी सरळ दिशेत प्रवास करतात तेव्हा त्याला 'मार्गी' होणे असे म्हणतात. तर ग्रह ज्यावेळी उलट दिशेने प्रवास करतात तेव्हा त्याला 'वक्री' होणे असे म्हटले जाते. ग्रहांच्या वक्री होण्याला अशुभ योग समजला जातो. कारण याचा काही राशींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. सध्या शनिदेव आपली वक्री चाल चालत आहेत. त्यामुळे काही राशींवर शनिचा अशुभ प्रभाव पडत आहे. त्यामुळे त्या राशींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिदेव कधी मार्गी होणार? आणि कधी या राशींना शनिदेवाच्या प्रकोपातून सुटका मिळणार? हे आपण आज जाणून घेणार आहोत.

वैदिक शास्त्रात शनिदेवाला कर्मानुसार फळ देणारा देवता म्हटले जाते. शनिदेव एखाद्या व्यक्तीला त्याच्या चांगल्या कर्मानुसार चांगले आणि वाईट कर्मानुसार वाईट फळ देत असतात. शनिदेवाचा प्रकोप प्रचंड असतो. त्यामुळेच प्रत्येक लोक शनिदेवाच्या प्रकोपापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. शनिदेव ज्या राशीवर अशुभ प्रभाव टाकतात त्या राशींना प्रत्येक गोष्टीत अडचणी येतात. महत्वाची कामे रखडतात. आर्थिक चणचण भासते. विविध मार्गाने अडचणी येतात. अशा गोष्टी घडू लागतात. सध्या शनिदेवाच्या वक्री होण्याने काही राशींना हा त्रास सहन करावा लागत आहे.

शनिदेव कधी होणार मार्गी?

ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे गोचर अत्यंत महत्वाचे आहे. ग्रहांच्या गोचरमधून राशींचे भविष्य ठरत असते. यामध्ये काही ग्रह मार्गी होऊन गोचर करतात. तर काही ग्रह वक्री होऊन प्रवास करतात. सध्या शनिदेव वक्री चाल चालत आहेत. गेल्या महिन्यात अर्थातच ३० जून २०२४ रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी शनिदेव कुंभ राशीतून वक्री झाले आहेत. शनिदेवाच्या वक्री चालीतून ५ राशींना नकारात्मक प्रभाव सहन करावा लागत आहे. शनिदेव मार्गी झाल्यास या राशींना त्रासातून सुटका मिळणार आहे. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी शनिदेव मार्गी होणार आहेत. यादिवशी सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी शनिदेव मार्गी होतील. त्यानंतर या पाच राशींना शनिदोषातून मुक्ती मिळणार आहे.

शनिदोषातून कोणत्या राशींची होणार सुटका?

शनिदेवाच्या वक्री होण्यातून राशीचक्रातील ५ राशींना नकारात्मक परिणाम सहन करावा लागत आहे. या राशींना साडेसाती आणि ढैय्याच्या त्रासातून जावे लागत आहे. शनिदेवाच्या उलट चालीमुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात विविध अडचणी येत आहेत. या लोकांना मानसिक, शारीरिक, आर्थिक, वैवाहिक, करिअर अशा सर्वच क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिदेव मार्गी झाल्यास या राशींना या त्रासातून सुटका मिळेल. सध्या शनिदोष सुरु असलेल्या राशींमध्ये वृश्चिक, कर्क, मीन, मकर आणि कुंभ या ५ राशींचा समावेश आहे.

शनिदेवाच्या अशुभ प्रभावातून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय

शनिदेवाच्या अशुभ प्रभावातून बचावासाठी शनिदेवाला तिळाचे तेल आणि काळी तीळ अर्पण करावी. अशाने शनिदेवाच्या आशीर्वाद प्राप्त होतो. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करण्याने आणि त्याची पूजा करण्यानेदेखील शनिदेव प्रसन्न होतात आणि आपला शुभ प्रभाव टाकतात.

Whats_app_banner