वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अवकाशात होणाऱ्या खगोलीय गोष्टींचा संबंध मानवी आयुष्याशीदेखील असतो. या खगोलीय घडामोडींना विशेष ज्योतिषीय महत्वदेखील आहे. नऊ ग्रहांच्या हालचालींवरुन ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला जातो. ग्रहांच्या स्थान बदलातून हालचालींमधून जे बदल घडून येतात, त्यावरूनच राशींचे भविष्य ठरवले जाते. त्यामुळेच राशीभविष्यात ग्रहांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका ठराविक काळात आपली राशी बदलत असतात. यामध्ये ग्रह एका राशीतून निघून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. यालाच गोचर किंवा संक्रमण असे म्हटले जाते.
दरम्यान काही ग्रह कित्येक वर्षानंतर एकत्र किंवा आमने-सामने येतात. यामध्ये शनि आणि सूर्याचादेखील समावेश आहे. शनिदेवाला कर्मानुसार फळ देणारे ग्रह संबोधले जाते. शिवाय शनिदेव सर्व ग्रहांमध्ये फारच संथ गतीने भ्रमण करत असतात. त्यामुळे शनि ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर दुसरीकडे सूर्य महिन्याला आपली राशी बदलत असतो. सूर्य आणि शनि यांच्यात पिता-पुत्राचे नातेसंबंध आहेत. परंतु या दोघांमध्ये शत्रुत्वाचा भाव आहे. ऑगस्ट महिन्यात सूर्य सिंह राशीत असणार आहे. तर शनि आपली स्वराशी कुंभ राशीत असणार आहे. अशाप्रकारे तब्बल ३० वर्षानंतर या दोन राशी आमने-सामने येणार आहेत.
सूर्य आणि शनिच्या आमने-सामने येण्याने वृषभ राशीसाठी अत्यंत फलदायी वातावरण निर्माण होणार आहे. याकाळात कार्यक्षेत्रात अधिकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य लाभेल. त्यामुळे कामात गती येईल. नवीन जबाबदाऱ्या पदरात पडतील. त्यातून करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. तुम्हाला अनपेक्षितपणे धनलाभ होण्याचा योग आहे. तुमची आर्थिक स्थिती उत्तम असणार आहे. उद्योग-व्यवसायात चांगला नफा होईल. शिवाय नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा होतील. त्यातून एकमेकांबाबत प्रेम आणि आदर वाढेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळ मानला जात आहे. याकाळात, तुम्हाला मनासारखी आणि मोठ्या पगाराची नोकरी मिळू शकते. तसेच तुम्हाला तुमच्या आवडीच्या ठिकाणी बदलीही मिळू शकते. याशिवाय अनपेक्षित मार्गाने धनलाभ होऊन तुमच्या संपत्तीत वाढ होईल. जे लोक बेरोजगार आहेत किंवा अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगल्या कंपनीत नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. याकाळात तुमच्या व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल. जोडीदारासोबत लग्नाच्या दृष्टिकोनातून चर्चा होईल. त्यातूनही सकारात्मक मार्ग निघेल.
वृश्चिक राशीच्या लोकांना शनि-सूर्य योगात अत्यंत फायदा मिळणार आहे. याकाळात उद्योग-व्यवसायात तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल. सहकाऱ्यांमध्ये तुमच्याबद्दल आदर आणि सन्मान वाढेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे अचानक पूर्ण होतील. विवेक बुद्धीने घरातील समस्यांवर तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या बातमीने तुमच्या आनंदात भर पडेल. मनाला समाधानही लाभेल. तुमच्या मितभाषी बोलण्याने लोक आकर्षित होतील. दिवसभर उत्साह आणि आत्मविश्वास जाणवेल. विविध मार्गाने धनलाभ होतील. त्यातून आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक भक्कम होईल. कामाच्या दृष्टीने नव्या योजना आखाल. त्याचा भविष्यात चांगला फायदा होईल.
संबंधित बातम्या