Shani nakshatra parivartan 2024 : शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार चांगले किंवा वाईट फळ देतात. शनीच्या प्रत्येक हालचालीचा सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव पडतो. सध्या शनी कुंभ राशीत आहे पण लवकरच शनि ग्रह नक्षत्र बदल करणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीला कर्म दाता शनिदेवाची कृपा प्राप्त होते, त्या व्यक्तीवर वाईट नजर देखील प्रभावी ठरते. सोप्या भाषेत सांगायचे तर, शनीच्या कृपेने माणसाच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि त्याला सुख-सुविधा मिळू लागतात. परंतू, शनि एक क्रुर ग्रह आहे. त्यामुळे ज्या राशीवर शनिची वाईट दृष्टी असते त्यांच्यावर शनिचा विपरित प्रभाव पडतो आणि त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
शनि ग्रह ऑक्टोबरमध्ये नक्षत्र बदलत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शनीचे नक्षत्र परिवर्तन होणार आहे. या दिवशी देवी भगवतीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार शनि राहूच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल.
गुरुवार, ३ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी शनी नक्षत्र बदल करेल. यावेळी शनि गुरु पूर्वाभाद्रपदाच्या नक्षत्रात भ्रमण करत आहे. ज्योतिषीय गणनेनुसार शनीचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश शुभ मानला जात नाही. जाणून घ्या शनीच्या नक्षत्र बदलाचा जनमानसावर काय परिणाम होईल-
शनि राहूच्या नक्षत्रात गेल्याने शनीच्या नकारात्मक प्रभावात वाढ होईल. अशा स्थितीत हे नक्षत्र बदल लोकांसाठी चांगलं मानलं जात नाही. राहूच्या युतीमुळे लोकांना त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला अस्वस्थता, चिंता इत्यादींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक समस्या निर्माण होतील. पैशाच्या बाबतीत तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागू शकते. कामात काही अडथळे येऊ शकतात. एकंदरीत शनीचे नक्षत्र बदल लोकांसाठी लाभदायक ठरणार नाही.
शनी सध्या स्वतःच्या कुंभ राशीत गोचर करत आहे आणि २९ मार्च २०२५ पर्यंत या राशीत राहील. शनि कुंभ राशीत असल्यामुळे कुंभ, मीन आणि मकर राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आहे, तर शनि ढैय्या कर्क आणि वृश्चिक राशीवर आहे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या