Shani Sadesathi: कुंभ राशीनंतर शनी नवीन वर्ष २०२५ मध्ये मीन राशीत प्रवेश करेल. जेव्हा शनी मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा अनेक राशींवर साडेसाती आणि ढैय्याचे समीकरण बदणार आहे. सन २०२५ मध्ये मेष राशीला साडेसाती सुरू होईल, तसेच सिंह आणि धनु राशीला ढैय्या सुरू होईल. या राशींना कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे जाणून घेऊ या. पाहू या यासाठी ज्योतिषांनी काय सल्ला दिला आहे ते…
सिंह आणि धनु शनीचा ढैय्या सुरू होईल. नवीन वर्षात मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु या राशींवर शनीचा प्रभाव राहील. काहींवर साडेसती चढण्याचा टप्पा असतो तर काहींवर उतरण्याचा टप्पा असतो.
शनीच्या साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात आरोग्याकडे लक्ष द्यावे, आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये. विशेषत: कुंभ राशीच्या लोकांवर साडेसातीचा शेवटचा टप्पा असेल, त्यामुळे या राशींनी नोकरी आणि आरोग्याकडे लक्ष द्यावे. कर्क आणि वृश्चिक राशीचा ढैय्या नवीन वर्षात एप्रिलच्या सुरुवातीला संपुष्टात येईल.
धनु आणि सिंह राशीच्या जातकांना काही अडचणी सुरू होतील, कारण त्यांच्यासाठी चढाईचा टप्पा असेल. ज्योतिषी पंडित दिवाकर त्रिपाठी यांच्यानुसार शनीच्या ढैय्या किंवा साडेसातीमध्ये आपल्या कर्मांवर नेहमी लक्ष ठेवावे. कारण जर आपले कर्म योग्य असेल तर शनीची ढैया आणि साडेसाती निश्चितच लाभदायक ठरेल.
शनी ही न्यायाची देवता असल्याने कर्म हा प्रमुख घटक आहे. त्यामुळे माणसाने नेहमी आपल्या कृतीकडे लक्ष दिले पाहिजे. कर्क आणि वृश्चिक शनीच्या प्रभावापासून मुक्त राहतील, तर सिंह आणि धनु राशी या २ राशींवर दुष्परिणाम होणार आहेत. परिणामी, अनियमित आणि विलंबाने काम केल्याने तणाव तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होतील.
Disclaimer- या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.