Shani And Rahu: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत राशी किंवा नक्षत्र बदलतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम देश आणि जगासह राशीचक्रातील १२ राशींवर होत असतो.ज्योतिषशास्त्रात शनी आणि राहू हे क्रूर ग्रह मानले जातात. शनिदेव कर्मानुसार लोकांना चांगले वाईट फळ देत असल्याची मान्यता आहे. प्रत्येक लोक शनिदेवाच्या प्रकोपापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. शनिदेव ज्या राशीवर अशुभ प्रभाव टाकतात त्या राशींना प्रत्येक गोष्टीत अडचणी येतात. महत्वाची कामे रखडतात. आर्थिक चणचण भासते. विविध मार्गाने अडचणी येतात. अशा गोष्टी घडू लागतात. परंतु शनिच्या शुभ प्रभावाने लोकांचे भाग्य उजळते.
तर राहुला मायावी ग्रह संबोधले जाते. या दोन्ही ग्रहांच्या हालचाली ज्योतिषीयदृष्ट्या महत्वाच्या आहेत. दरम्यान 8 जुलै रोजी राहूने शनीच्या नक्षत्रात म्हणजेच उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला होता. राहू तब्बल १८ महिने या नक्षत्रात राहील आणि काही राशींना राहूच्या नक्षत्र बदलाचे सकारात्मक परिणाम मिळतील. राहूच्या या नक्षत्र बदलाचा शुभ लाभ मिळणाऱ्या नशीबवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
राहू सध्या मकर राशीच्या तिसऱ्या घरात भ्रमण करत आहे. यामध्ये शनी धन आणि वाणीच्या भावात आहे. शनी आणि राहूची ही युती मकर राशीसाठी शुभ मानली जात आहे. याकाळात तुमचे धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. शिवाय तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. भावंडांचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील.
शनी आपल्या कर्मभावात भ्रमण करीत आहे. वृषभ राशीसाठी हा काळ चांगला राहील. नोकरदार लोकांसाठीही हा काळ उत्तम आहे. व्यापाऱ्यांना आर्थिक नफा होऊ शकतो. काही लोकांसाठी नोकरीच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय वाढवता येईल. आर्थिक लाभ होऊ शकतो. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते.या तिथींना जन्मलेल्या लोकांशनिदेवाची कृपादृष्टी असते.
राहू मिथुन राशीच्या दहाव्या भावात आणि शनी नवव्या भावात भ्रमण करत आहे. शनी आणि राहूची ही स्थिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे उत्पन्न वाढेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही भरपूर पैसे कमवाल. नोकरी बदलायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. याकाळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.
संबंधित बातम्या