Shani Margi : दिवाळीनंतर बदलतेय शनीची चाल, कोणत्या राशींना मिळणार शनीचा आशीर्वाद?
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Shani Margi : दिवाळीनंतर बदलतेय शनीची चाल, कोणत्या राशींना मिळणार शनीचा आशीर्वाद?

Shani Margi : दिवाळीनंतर बदलतेय शनीची चाल, कोणत्या राशींना मिळणार शनीचा आशीर्वाद?

Updated Oct 30, 2024 01:35 PM IST

saturn direct after Diwali: दिवाळीनंतर शनीची चाल बदलत आहे. नोव्हेंबरमध्ये शनी मार्गी होणार आहे. शनी मार्गावर असताना कोणत्या राशींना होईल फायदा आणि कोणत्या राशींना मिळणार शनिदेवाचा आशीर्वाद, जाणून घ्या...

दिवाळीनंतर बदलतेय शनीची चाल, कोणत्या राशींना मिळणार शनीचा आशीर्वाद?
दिवाळीनंतर बदलतेय शनीची चाल, कोणत्या राशींना मिळणार शनीचा आशीर्वाद?

Shani Margi after Diwali: दिवाळीनंतर शनीची चाल बदलत आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये शनी मार्गी होणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनी मार्गात असणे अत्यंत शुभ मानले जाते. मार्गी होताच शनी विरुद्ध दिशेने जाणे थांबवतो. त्यामुळे लोकांच्या जीवनातील अनेक संकटे दूर होतात असे मानले जाते. शनी सध्या कुंभ राशीत असून वर्ष २०२५ मध्ये आता या राशी बदलणार आहेत. दिवाळीनंतर शनीचे परिवर्तन अतिशय खास मानले जाते. शनिदेव १५ नोव्हेंबरपासून कुंभ राशीत सरळ चालीत चाल करायला सुरुवात करत आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या राशींना शनीचा फायदा होईल आणि कोणत्या राशींना मिळणार शनीचा आशीर्वाद, जाणून घ्या…

कर्क राशीसाठी काळ चांगला

दिवाळीनंतरचा काळ हा कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे.  कर्क राशीच्या जातकांंच्या आयुष्यात बराच काळ सुरू असलेली उलथापालथ आता शांत होणार आहे. शनिदेव आता तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्मांचे फळ देतील आणि तुमची सर्व बिघडलेली कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे आता तुम्हाला तणावापासून मुक्ती मिळणार आहे. ताणतणाव दूर झाल्यानंतर तुम्हाला मन:शांतीचा लाभ होणार आहे.

मकर राशीच्या जातकांसाठी काळ फारसा चांगला नाही

मकर राशीच्या जातकांसाठी वेळ फारसा चांगला नाही असे दिसते. असे असले तरी एकंदरीत विचार करता तुमच्यासाठी येणारा काळ ठीकठीक आहे असे म्हणता येते. यावेळी तुम्ही सर्वांसोबत आपले चांगले वर्तन ठेवा. कोणी बोलल्याशिवाय एखाद्या वादात शिरण्याचा प्रयत्न करू नका. त्याचप्रमाणे लव्ह लाईफमध्ये योग्य गोष्टींसाठी प्रयत्नशील राहा. तुमच्या प्रेमजीवनात प्रयत्नांची आवश्यकता आहे.

मीन राशीच्या लोकांमध्ये येणार नवी पहाट 

मीन राशीच्या जातकांसाठी दिवाळीनंतरचा काळ चांगला राहील असे दिसते. या राशीचे जातक आता पूर्वीच्या परिस्थितीतून मुक्त होतील. मीन राशीच्या जातकांसाठी एक नवे जीवन वाट पाहत आहे. लवकरच तुमच्या जीवनात नवी पहाट येत आहे. अशा वेळी तुम्हाला तुमच्या लव्ह लाईफ आणि प्रोफेशनल लाईफवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि गोष्टी नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करावा लागेल.

डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. या माहितीचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner