Shani Gochar: २०२५ मध्ये २९ मार्चला शनी कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल. हा दिवस खूप खास असणार आहे. कारण याच दिवशी शनी अमावस्या देखील असते. एका दिवसानंतर चैत्र महिना सुरू होतो, म्हणजे पंचांगनुसार नववर्ष. चैत्र महिन्यात दुसऱ्या दिवसापासून नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. ज्योतिषी दिवाकर त्रिपाठी यांच्यानुसार शनी २९ मार्च २०२५ रोजी कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल. या राशीत शनी सुमारे अडीच वर्षे मीन राशीत राहील. शनीच्या राशीपरिवर्तनाचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे.
२९ मार्चला शनी राशी बदलत आहे, त्या दिवशी सूर्यग्रहणही होत आहे. २९ मार्च ला २०२५ सालचं पहिलं सूर्यग्रहण होणार आहे. सूर्यग्रहणापूर्वी शनीचा हा बदल अनेक राशींवर परिणाम करेल. हे ग्रहण २९ मार्च रोजी दुपारी २ वाजून २१ मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी ६ वाजून १४ मिनिटांनी संपेल.
सूर्याबद्दल बोलायचे झाल्यास सूर्य सध्या मकर राशीत फिरत आहे. फेब्रुवारीमध्ये सूर्य शनीच्या कुंभ राशीत आणि त्यानंतर मार्चमध्ये गुरूच्या मीन राशीत प्रवेश करेल. २९ तारखेला शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. अशा तऱ्हेने गुरूच्या मीन राशीत शनी आणि रवी या दोघांच्या आगमनामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतील. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच वर्षांचा कालावधी लागतो. चला तर मग जाणून घेऊ या, या सर्व बदलांचा वेगवेगळ्या राशींवर कसा परिणाम होईल.
मेष राशीला शनीची साडेसाती सुरू होत आहे. अशावेळी या राशीच्या प्रेमजीवनावर आणि नोकरीवर परिणाम होईल. पण प्रेमजीवनाच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या पार्टनरचं ऐकून घ्यावं लागेल. याशिवाय कुंभ आणि मकर राशीवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे, याचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या