Shani Gochar News in Marathi: २०२५ लवकरच सुरू होणार आहे. २०२५ मध्ये अनेक मोठे ग्रह आपली हालचाल बदलतील. २०२४ मध्ये शनिदेवांनी राशी बदलली नाही. आता शनी आगामी वर्षात आपली चाल बदलणार आहे. नवीन वर्ष २०२५ मध्ये कर्मफळ देणारा शनी मीन राशीत भ्रमण करणार आहे. मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीन राशीत शनीच्या प्रवेशाने मेष राशीत शनीची साडेसाती सुरू होईल. वर्ष २०२५ मध्ये शनी मीन राशीत भ्रमण करणार आहे. शनीचे हे गोचर काही राशींसाठी शुभ फळ देऊ शकते.
सन २०२५ मध्ये शनीच्या मीन राशीतील गोचरामुळे वृश्चिक, कर्क आणि मकर या राशींच्या जातकांना मोठा फायदा होणार आहे. आर्थिक अडचणी दूर होणे, पदोन्नती मिळणे, प्रगतीचे मार्ग खुले होणे, प्रेमजीवनात सफलता मिळणे, नवा व्यवसाय सुरू करण्याचे मार्ग मिळणे आणि कुटुंबात शुखशांती नांदणे, तसेच उत्तम आरोग्य राहणे असे फायदे या ३ राशींच्या जातकांना मिळणार आहेत.
शनीचे मीन राशीत होणारे गोचर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी फायदेशीर ठरू शकते. जीवनातील अडचणी हळूहळू संपुष्टात येतील. नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या संघर्षाचे फळ तुमच्या करिअरमध्ये मिळेल. पदोन्नतीचीही शक्यता आहे. त्याचबरोबर जंक फूडपासून दूर राहून आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. सहलीलाही जाऊ शकता.
कर्क राशीच्या जातकांसाठी शनीचे मीन राशीचे संक्रमण फायदेशीर ठरू शकते. आगामी वर्षात आपल्या प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. काही लोक मालमत्ता खरेदी देखील करू शकतात. जे लोक नोकरी करतात त्यांना अनेक नवीन कामे मिळतील. किरकोळ अडचणींवर सहज मात कराल. तुमच्या प्रेमजीवनात देखील रोमान्स राहील.
राशीच्या लोकांसाठी शनीचे गोचर शुभ सिद्ध होऊ शकते. मित्रांकडून सहकार्य मिळेल. तब्येतीत सुधारणा होईल. व्यापाऱ्यांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला सौदा मिळू शकतो. कुटुंबात सुख-शांती राहील. त्याचबरोबर धार्मिक कार्यातही रस वाटेल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.