Transit Shani Horoscope in Marathi: ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाधीश आणि कर्मदात्याचा दर्जा देण्यात आला आहे. कुंभ राशीचे स्वामित्व शनिदेवाला प्राप्त आहे. सध्या शनी आपल्या कुंभ राशीत विराजमान आहे आणि तो सरळ गतीने भ्रमण करीत आहे. शनीची शुभ स्थिती काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. शनी १५ नोव्हेंबरपासून कुंभ राशीत भ्रमण करीत आहे. दृक पंचांगानुसार शनी १२ जुलै २०२५ पर्यंत थेट गतीत भ्रमण करणार आहे. जाणून घेऊया, कुंभ राशीत शनीच्या संक्रमणाचा फायदा कोणत्या राशींना होऊ शकतो.
मिथुन राशीच्या जातकांसाठी कुंभ राशीतील शनीचा मार्ग अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. शनिदेवाच्या शुभ प्रभावाने मिथुन राशीचे जातक करिअरमध्ये प्रगती करतील. व्यवसायात देखील शनीच्या गोचराचा मिथुन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. मिथुन राशीच्या जातकांचे प्रेमजीवन देखील अतिशय रोमँटिक असणार आहे. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते घट्ट होईल. त्याच प्रमाणे तुमची आर्थिक परिस्थितीही चांगली राहील.
शनीची कुंभ राशीतील सरळ चाल तूळ राशीच्या जातकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. शनीच्या या मार्गक्रमणामुळे कुंभ राशीच्या जातकांना बऱ्याच स्त्रोतांमधून कमाई करण्याची संधी प्राप्त होणार आहे. या ग्रहाच्या स्थितीमुळे तुम्हाला कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. करिअरमध्ये तुमच्या कौशल्याने विजय मिळवाल. आपल्या जीवनसाथीबरोबरचे आपले संबंध देखील सुधारतील. यामुळे तुमचे प्रेमजीवन चांगले होणार आहे.
शनीचे कुंभ राशीत होणाऱ्या गोचरामुळे होणारे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. या दरम्यानच्या काळात तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तुम्ही ज्या कार्याला तुम्ही हात लावाल त्या कार्यात आपला झेंडा फडकवल्यावाचून राहणार नाहीत. या ग्नहस्थितीमुळे नशीबाचे फासे तुमच्या बाजूने पडणार आहेत. याचे अनेक फायदे तुम्हाला होतील. तुम्हाला खूप सकारात्मक वाटेल. कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगला जाणार आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.