Shani Gochar In Purva Bhadrapada Nakshatra December 2024 : हिंदू धर्मात राशी, नक्षत्र आणि ग्रह यांच्या बहदलाला फार महत्व आहे. प्रत्येक ग्रह आपल्या कालगणनेनुसार राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात. ग्रहांचा बदल काही राशीच्या लोकांसाठी शुभ ठरतो तर काही राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरतो.
शनीचे राशीपरिवर्तन असो वा नक्षत्र परिवर्तन, मार्गी होणार असो किंवा वक्री संक्रमण, शनीची प्रत्येक हालचाल महत्त्वाची मानली जाते. कर्माचे फळ देणाऱ्या शनिचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येतो. नवीन वर्षात राशी बदलण्यापूर्वी शनी नक्षत्र बदलणार आहे. या वर्षाच्या अखेरीस शनिदेव गुरूच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनीचे गुरूच्या नक्षत्रात होणारे संक्रमण काही राशींना सकारात्मक परिणाम देऊ शकतात. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी वर्षाच्या शेवटी शनीचे नक्षत्र परिवर्तन शुभ मानले जात आहे.
पंचांगानुसार शनी सध्या शताभीष नक्षत्राच्या चौथ्या पदात भ्रमण करत आहे. शुक्रवार २७ डिसेंबर रोजी शनिदेव पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या पदात प्रवेश करतील. या नक्षत्राचा स्वामी गुरू ग्रह आहे. अशात ३ राशीच्या लोकांना फायदा होणार आहे.
गुरूच्या नक्षत्रात शनीचे हे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक मानले जाते. शनी अकराव्या भावात भ्रमण करणार आहे. वर्षानुवर्षे रखडलेले आपले काम पूर्ण होऊ शकेल. मित्रांची भेट होऊ शकते. तसेच धन आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. मालमत्ता किंवा वाहने खरेदी करण्याची शक्यता आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी शनीचे गुरूच्या नक्षत्रातले संक्रमण शुभ मानले जात आहे. कुटुंब आणि पितरांचे आशीर्वाद मिळतील. शनीच्या कृपेने समाजात तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. शत्रूंवर विजय मिळवू शकाल. व्यावसायिक समस्यांमध्ये लाभ मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांना शनीचे गुरूच्या नक्षत्रातील संक्रमणाचा फायदा होऊ शकतो. करिअरच्या बाबतीत तुम्ही यश मिळवू शकता. पैसे कमावण्याचे नवे स्त्रोत निर्माण होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असल्याचे दिसून येत आहे. पदोन्नतीचीही शक्यता आहे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या