Shani Gochar: एकाच दिवशी सूर्यग्रहण आणि शनी गोचर! ‘या’ ३ राशींसाठी पुढची अडीच वर्ष खूप त्रासदायक
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Shani Gochar: एकाच दिवशी सूर्यग्रहण आणि शनी गोचर! ‘या’ ३ राशींसाठी पुढची अडीच वर्ष खूप त्रासदायक

Shani Gochar: एकाच दिवशी सूर्यग्रहण आणि शनी गोचर! ‘या’ ३ राशींसाठी पुढची अडीच वर्ष खूप त्रासदायक

Jul 22, 2024 01:37 PM IST

Shani Gochar And Surya Grahan: येत्या नव्या वर्षात म्हणजे २०२५मध्ये शनीच संक्रमण आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी होणार आहे. शनी आणि सूर्याच्या या युतीचा अनेक राशींवर अशुभ प्रभाव पडणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी…

एकाच दिवशी सूर्यग्रहण आणि शनी गोचर! ‘या’ ३ राशींसाठी पुढची अडीच वर्ष खूप त्रासदायक
एकाच दिवशी सूर्यग्रहण आणि शनी गोचर! ‘या’ ३ राशींसाठी पुढची अडीच वर्ष खूप त्रासदायक

Shani Gochar And Surya Grahan 2025: ज्योतिषशास्त्रात, नवग्रहांमध्ये शनीला न्यायाधीशाचे स्थान आहे. शनी गोचर ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यावर्षी शनी संक्रमणाच्या दिवशी सूर्यग्रहण होत आहे, हा अत्यंत दुर्मिळ योगायोग मानला जात आहे. सध्या शनी स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. या वर्षात म्हणजे २०२४मध्ये शनी कोणत्याही राशीत भ्रमण करणार नाही. शनी २९ मार्च २०२५ रोजी कुंभ राशीतून बाहेर पडून, मीन राशीत प्रवेश करेल. या दिवशीच सूर्यग्रहणाची घटना घडणार आहे. शनी आणि रवि हे दोन ग्रह एकमेकांचे शत्रू आहेत. त्यामुळे शनी आणि सूर्याच्या या घटनेचा काही राशीच्या लोकांवर अशुभ परिणाम होणार आहे. जाणून घ्या सूर्यग्रहणाच्या या दिवशी कोणत्या राशींवर अशुभ परिणाम होणार आहेत, ते जाणून घेऊया…

शनी गोचर 

शनी राशी परिवर्तन २९ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून ०१ मिनिटांनी होणार आहे. शनी आपल्याच राशीतून कुंभ राशीतून बाहेर पडून गुरूच्या मीन राशीत गोचर करेल. न्यायाचा देवता शनी सुमारे अडीच वर्षांत राशी बदलणार आहे. अशा परिस्थितीत शनी २०२७पर्यंत मीन राशीत राहील. हे गोचर अडीच वर्षे चालणार आहे. शनी ३ जून २०२७, गुरुवार सकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करेल.

Weekly Tarot Card Reading : धन योगामुळे या राशींचे चमकणार नशीब, वाचा साप्ताहिक टॅरो कार्ड राशीभविष्य

शनी गोचर आणि सूर्यग्रहणाचा कोणत्या राशींवर अशुभ प्रभाव पडणार?

मिथुन : तुम्हाला शनी संक्रमण आणि सूर्यग्रहणाचा संमिश्र प्रभाव दिसेल. नशिबाची साथ कमी मिळेल. या काळात तुमचा खर्च वाढू शकतो. उत्पन्नाची आवक कमी होऊ शकते. मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळणार नाही.

धनु : धनु राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीची घटना अशुभ ठरणार आहे. करिअरबाबत ताण वाढू शकतो. जोडीदारासोबतच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती सामान्य राहणार आहे. या काळात अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत.

वृश्चिक राशी : वृश्चिक राशीच्या लोकांना एकाच दिवशी शनी संक्रमण आणि सूर्यग्रहण होणे फायद्याचे ठरणार नाही. या काळात तुमची आर्थिक स्थिती अजिबात सुधारणार नाही. कामात अपयश आल्याने मन अशांत राहू शकते. या काळात कोणताही निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्या.

Whats_app_banner