ग्रह-नक्षत्राचा प्रभाव राशींवर झाल्यावर काही राशींना लाभ होतो तर काही राशीच्या लोकांना तोटा सहन करावा लागतो. प्रत्येक ग्रह आपल्या कालगणनेनुसार राशीपरिवर्तन आणि नक्षत्रपरिवर्तन करतो.
या वर्षी २०२४ मध्ये शनिने आपली राशी बदललेली नाही. परंतु २०२५ मध्ये शनि ग्रह आपली राशी बदलेल, प्रतिगामी देखील होईल आणि आपले नक्षत्र देखील बदलेल. शनीच्या या बदलामुळे शनि साडेसाती असणारे लोकांचे समीकरणही बदलणार आहे.
शनि आता मीन राशीत जाणार आहे. २०२५ मध्ये, शनि गुरूच्या मीन राशीत प्रवेश करेल. या बदलामुळे मीन राशीवरही शनि ग्रह नियंत्रण ठेवेल. या राशीवर शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरू होईल. यापासून मुक्त होण्यासाठी मीन राशीला बराच काळ वाट पाहावी लागेल, कारण या राशीची साडेसाती २०३० मध्ये संपणार आहे. या काळात कोणत्या राशींवर शनीची साडेसाती सुरू होईल आणि कोणत्या राशींवर शनीचे नियंत्रण असेल, म्हणजे कोणत्या राशीवर शनि साडेसातीचा प्रभाव राहील आणि कोणत्या राशीच्या लोकांवर शनी ढैय्याचा प्रभाव असेल जाणून घ्या.
वर्ष २०२३ मध्ये शनि ग्रह कुंभ राशीच्या नियंत्रणात होता. १७ जानेवारी २०२३ रोजी शनी कुंभ राशीत विराजमान झाला आणि त्यानंतर आता २०२५ पर्यंत शनी याच राशीत राहील. यानंतर मकर, कुंभ आणि मीन राशीवर शनीच्या साडेसातीने ताबा घेतला. याशिवाय कर्क आणि वृश्चिक राशीवर शनीच्या ढैय्याचा प्रभाव आहे.
मकर राशीवरून शनीच्या साडेसातीचे नियंत्रण दूर होईल. यावेळी, मकर राशीवरील साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे. २०१७ ते २०२५ हा प्रवास या राशीसाठी चढ-उतारांचा होता. आता बृहस्पतिच्या मीन राशीत येईल आणि शनिच्या या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांनाही बरेच फायदे होतील.
कुंभ राशीच्या लोकांना फेब्रुवारी २०२८ मध्ये शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. याशिवाय सन २०२५ पासून मेष राशीवरही शनीची साडेसाती सुरू होईल. जी मे २०३२ पर्यंत चालेल. अशात या राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे आणि शनि साडेसाती कमी राहावी यासाठी काही उपाय करून जीवनात सुख आणण्याचा प्रयत्न करावा.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)