Shani Impact In Marathi : शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे. शनीदेव कोणत्याही मनुष्याच्या जीवनात शिस्त, संघर्ष आणि यश घेऊन येतो. शनीची स्थिती आपल्या कुंडलीतील त्याच्या उपस्थितीवर अवलंबून असते. येथे अशी लक्षणे सांगत आहोत, जी आपल्या राशीत शनी कमकुवत किंवा बलवान असल्याचे दर्शविते, परंतु आपल्या जन्म कुंडलीच्या स्थितीवरून चांगली माहिती घेतली जाईल. येथे आपण या सामान्य लक्षणांवरून शनी तुमच्या कुंडलीत बलवान आहे की कमकुवत याचा अंदाज लावू शकता. तुळ राशीतील शनी बलवान आणि मेष राशीत शनी कमकुवत असल्याचे सांगितले जाते.
२०२५ मध्ये शनीची हालचाल
त्यामुळे जर तुम्हाला शनीच्या साडेसाती ढैय्यासारख्या वाईट परिणामाची चिंता वाटत असेल तर आधी तुमच्या जन्मकुंडलीत शनीचे स्थान काय आहे ते पाहून घ्या. आगामी वर्ष २०२५ मध्ये शनी राशी परिवर्तन करणार आहे. शनी २०२५ मध्ये मीन राशीत प्रवेश करेल. सध्या शनी कुंभ राशीत विराजमान आहे. पुढील वर्षी जुलै २०२५ पर्यंत शनी या मार्गावर राहील. शनीच्या या सर्व मोठ्या बदलांमुळे तुम्ही शनीची स्थिती पाहू शकतात.
शनी तुमच्या कुंडलीत कमकुवत असेल, तर तुम्ही आळशी व्हाल. तुम्हाला शिस्त लागणार नाही. तुमची नोकरी टिकणार नाही. एका ठिकाणी नोकरी राहणार नाही, नोकरीत सातत्याने बदल होईल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमचे कर्मचारी लोक तुमच्यावर खूश होणार नाहीत, नोकरी बदलतील. जर या लोकांना वाईट वागणूक दिली जात असेल तर त्यांच्याशी चांगली वागणूक असू द्या. यामुळे शनी बळकट होईल. शनी कमकुवत असेल तर ती व्यक्ती आपल्या म्हणण्यावर ठाम राहू शकत नाही. नोकरीत अडचण येईल. मज्जासंस्थेच्या समस्या वाढू शकतात.
वेळोवेळी नखे आणि केस कापून ठेवा. दररोज स्वच्छता ठेवा आणि तुम्ही देखील स्वच्छ राहा, दररोज आंघोळ करा आणि जीवनात शिस्त ठेवा.
शनिवारी एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. गरिबांना मदत करा. कधीही कोणाशी वाईट बोलू नका. जास्त शिळे आणि खराब अन्न खाऊ नका. जेवणात काळे पदार्थ खा उदा काळा हरभरा, डाळ इ. शनि मंत्राचा जप करा. शनिदेवाची मनोभावे आराधना करा.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)