Shani Gochar 2024: यंदा १९ ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधनसारखा मोठा सण साजरा केला जाणार आहे. तत्पूर्वी १८ ऑगस्ट रोजी शनिदेव पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील. रक्षाबंधनाच्या एक दिवस आधीच शनिदेव नक्षत्र बदलतील. शनिदेव नक्षत्र बदलताच काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम प्राप्त होतील. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनिदेवाला पापी ग्रह म्हणतात. शनी देवाच्या अनिष्ट प्रभावाला प्रत्येकजण घाबरतो. कुंडलीत जेव्हा शनीदेव अशुभ स्थानात असतात, तेव्हा व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु जेव्हा ते शुभ स्थानात असतात तेव्हा तुमचे आयुष्य उजळून निघते.
शनिदेवाच्या चाल बदलाने मेष राशीच्या लोकांना आहे. याकाळात तुम्हाला महत्वाच्या कामात आईची साथ मिळेल. स्पर्धा परीक्षा आणि मुलाखती इत्यादींचे सुखद परिणाम मिळतील. कुटुंबात धार्मिक-अध्यात्मिक कार्ये घडतील. वाहन खरेदी होऊन भौतिक सुखांत वाढ होईल. वैवाहिक सुखात वाढ होईल. लेखन कार्यातून उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
याकाळात मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल. आईकडून आर्थिक मदत मिळेल. कला आणि संगीताची आवड निर्माण होईल. नोकरीत कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. हे स्थान बदलणे तुम्हाला लाभदायक ठरेल. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. मिळकतीचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पार पडतील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वाहनसुविधेचा लाभ शक्य आहे.
सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात धार्मिक कार्ये होतील. मुलांच्या आनंदात वाढ होईल. उच्च शिक्षण आणि संशोधन इत्यादींसाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. मनात शांती आणि आनंदाची भावना राहील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आई किंवा कुटुंबातील वृद्ध महिलेकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
याकाळात तुमच्या मनात शांती आणि आनंदाची भावना राहील. शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम मिळतील. तुम्हाला संशोधन वगैरेसाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल. नोकरीत तुम्हाला अधिका-यांचे सहकार्य मिळेल. बदली होऊ शकते. कपडे खरेदी करण्याकडे कल वाढेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. उत्पन्न वाढेल, स्थावर संपत्तीही वाढेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल.