Shani Vakri: जोतिषशास्त्रानुसार, शनीला सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक समजले जाते. शनी देवाच्या हालचालींमुळे प्रत्येक राशींवर शुभ-अशुभ परिणाम दिसून येत असतात. अशातच एखादया व्यक्तीवर शनी देवाचा प्रकोप सुरू असेल तर, त्याचा मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे वेळीच शनीची महादशा ओळखून उपाय करणे महत्वाचे असते. मात्र, शनीची महादशा ओळखावी कशी याबाबत आज आपण काही महत्त्वाची लक्षणे जाणून घेणार आहोत. त्यानुसार तुम्हाला भविष्यात उपाय करणे सोयीचे होईल.
शास्त्रानुसार, शनी देवाला न्याय देवता असे संबोधले जाते. शनी देव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार फळ देत असतात. वैदिक शास्त्रानुसार, ज्या लोकांनी कुकर्म केले आहेत शनी देव त्यांच्यावर नाराज होतात आणि त्या लोकांना त्यांचा प्रकोप सहन करावा लागतो. शनी देवाचा प्रकोप झाल्यास लोकांना साडे सातीचा त्रासही सहन करावा लागतो. परंतु काही लोकांना आपल्या कुंडलीबाबत काहीच माहिती नसते, अशा लोकांच्या आयुष्यात वाईट काळ सुरु असल्यास हा त्रास साडे सातीमुळेच होतोय का? हे समजून येत नाही.
१) जोतिषशास्त्रानुसार, ज्या लोकांवर शनी देवाचा प्रकोप सुरू आहे त्या लोकांच्या सांध्यांमध्ये नेहमीच वेदना होत असतात. त्यांना दररोजची कामे करण्यातच नव्हे, तर उठबस करण्यासही त्रासदायक होते.
२) शनिदेवाचा प्रकोप झालेले लोक आळशीवृत्तीचे होतात. कोणत्याही कामात त्यांचे मन लागत नाही. त्यामुळे त्यांना कोणत्याच कामात यश मिळत नाही. चांगल्या कामात सतत अडचण यायला सुरुवात होते.
३) अशा लोकांना सतत समाजात अपमान सहन करावा लागतो. कामाच्या ठिकाणी चुकीचे आरोप लागू शकतात. चांगली नोकरी हातातून सोडावी लागते.
४) बऱ्याचावेळा शनीचा प्रकोप झाल्यास त्या व्यक्तीवर चोरीचा आळ येऊ शकतो. इतकेच नव्हे तर ती व्यक्ती कायदेशीर बाबींमध्ये अडकू शकते.
५) शनी देवाचा प्रकोप असलेल्या व्यक्तींची प्रगती होत नाही. याउलट ती व्यक्ती कर्जबाजारी होऊ लागते. अतोनात प्रयत्न करुनही त्यांना कर्जाची परतफेड करता येत नाही.
६) अशा व्यक्तींना जवळच्या व्यक्ती किंवा सोबत काम करणारे सहकारीच दगाबाजी करतात. तसेच पैशांची फसवणूक करतात.
७) शनीचा प्रकोप असणाऱ्या लोकांना हाती घेतलेल्या कोणत्याच कामात यश मिळत नाही. क्षमता असूनदेखील सतत पराभवाला सामोरे जावे लागते.
८) शनी प्रकोपात असणारे लोक विनाकारण कोर्ट कचेरीच्या भानगडीत अडकू शकतात. त्यामुळे त्यांची बदनामीसुद्धा होते.
९) शनीचा प्रकोप सुरू असेल तर त्या व्यक्तींचे केस अवकाळी पांढरे होऊ लागतात. चेहरा निस्तेज होतो. कमी वयातसुद्धा असे लोक काहीसे वृद्ध दिसायला लागतात.
१०)शनी देवाचा प्रकोप असणाऱ्या लोकांच्या चपला सतत तुटत असतात किंवा गहाळ होत असतात. त्यांना विनाकारण पळापळी करावी लागते.
संबंधित बातम्या