ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा सर्व राशींवर प्रभाव होतो. एकाच राशीत दोन ग्रहांचा संयोग झाल्यास त्यास त्या ग्रहांची युती झाली असे म्हणतात, तर तीन ग्रहांचा संयोग झाल्यास त्रिग्रही योग निर्माण होतो. नवीन वर्षान अनेक शुभ योग संयोग तयार होत आहे.
जानेवारी ७ ला बुध ग्रह राशी बदलणार आहे. ७ जानेवारीला बुध्दी आणि व्यापाराचा कारक ग्रह बुध धनु राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा सर्व राशींवर प्रभाव होईल. यानंतर बुध २० फेब्रुवारी २०२४ मंगळवारी, सकाळी ६ वाजून ७ मिनिटांनी शनिच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत असणाऱ्या शनि सोबत बुधची युती होईल. यामुळे ३ राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत प्रचंड लाभ होण्याची शक्यता आहे. कारण शनि-बुध युती धनभावात होईल.
शनि आणि बुध दोन्ही ग्रह व्यापार आणि वाणिज्याचे कारक आहे, यामुळे या युतीचा प्रभाव व्यापाऱ्यांवर आणि उद्योजकांवर होईल. नवीन व्यापार सुरु करण्यासाठी हा चांगला काळ राहील.
ही वेळ फार फायदेशीर राहील. भाग्याची साथ मिळेल, परंतू गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. आधी केलेली गुंतवणूक नफा देईल. धनवृद्धीचे योग आहेत. पैसा ग्रो होईल. व्यवहार नफ्याचे होतील.
ही युती मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या राशीच्या लोकांना व्यवसायात खूप लाभ होण्याचे योग आहेत. बुध व शनिची युती धनवृद्धीसाठी चांगली फलप्राप्ती देईल. फायदेशीर फेब्रुवार ठरेल.
एखाद्या स्पर्धा-परिक्षेची तयारी करत असाल तर आता मन लावून अभ्यास कराल. या वेळेत जी तयारी कराल ती लाभप्रद राहील. आधी केलेले नियोजन फायदेशीर ठरेल. धनवृद्धी होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या