Shani Ast : फेब्रुवारीमध्ये शनि होणार अस्त; या ४ राशीच्या लोकांना कर्जातून मिळणार मुक्ती, आर्थिक लाभ होणार
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Shani Ast : फेब्रुवारीमध्ये शनि होणार अस्त; या ४ राशीच्या लोकांना कर्जातून मिळणार मुक्ती, आर्थिक लाभ होणार

Shani Ast : फेब्रुवारीमध्ये शनि होणार अस्त; या ४ राशीच्या लोकांना कर्जातून मिळणार मुक्ती, आर्थिक लाभ होणार

Published Feb 11, 2025 08:56 AM IST

Shani Ast February 2025 Rashi Bhavishya In Marathi : शनी फेब्रुवारीमध्ये अस्त होईल आणि मार्चमध्ये गुरूच्या मीन राशीत प्रवेश करेल. जाणून घ्या कोणत्या राशींना शनी अस्त आणि शनी संक्रमणाचा फायदा होईल.

शनि गोचर २०२५
शनि गोचर २०२५

Shani Asta And Shani Gochar 2025 In Marathi : ग्रह-नक्षत्र आपल्या कालगणनेनुसार राशी आणि नक्षत्र बदलतात. ग्रहांच्या बदलाचा प्रत्येक राशीवर शुभ किंवा अशुभ परिणाम होतो. ग्रहांच्या शुभ परिणामामुळे व्यक्तीच्या अडचणी दूर होतात तर ग्रहाच्या अशुभ परिणामामुळे व्यक्तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ग्रह काही कालावधीनंतर आपली चालही बदलतात. ग्रहांच्या चाल बदलामुळेही व्यक्तिला चांगला किंवा वाईट परिणामाला सामोरे जावे लागते.

ज्योतिषशास्त्रानुसार शनि एका राशीतून दुसऱ्या राशीत सुमारे अडीच वर्षात प्रवेश करतो. २०२३ नंतर २९ मार्च २०२५ रोजी शनी आपली राशी बदलणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शनि प्रथम स्थान बदलेल आणि मार्चमध्ये संक्रमण करेल. सध्या शनी कुंभ राशीत असून २९ मार्च रोजी मीन राशीत येईल. या आधी २८ फेब्रुवारीला शनि अस्त होणार आहे आणि संपूर्ण मार्चमध्ये अस्त स्थितीत राहील. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये शनीच्या स्थितीत होणारा बदल सर्व १२ राशींवर परिणाम करेल. परंतु काही राशींसाठी शनीची अस्त स्थिती कशी राहील, जाणून घ्या कोणत्या राशींना शनि अस्त होण्यामुळे फायदा होईल-

वृषभ - 

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती शुभ राहणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कर्जातून मुक्ती मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीसह व्यवसायाची स्थिती चांगली राहील.

कर्क - 

कर्क राशीच्या लोकांसाठी शनीची अस्त स्थिती आणि गोचर उत्तम राहणार आहे. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. नोकरीत बढतीसह उत्पन्न वाढू शकते. आर्थिकदृष्ट्या जीवन सुखी होईल. परदेशी व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होईल.

मकर - 

मकर राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती खूप शुभ आणि फलदायी असणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जुन्या मार्गानेही पैसे येतील. सुदैवाने काही कामे मार्गी लागतील. वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या यश मिळेल.

धनु - 

धनु राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे. भौतिक सुखसोयी आणि संपत्तीत वाढ होईल. आर्थिक विवंचनेतून सुटका मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Priyanka Chetan Mali

TwittereMail

प्रियंका माळी ही हिंदुस्तान टाइम्स -मराठीमध्ये कन्टेन्ट रायटर असून ती राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषयांचा अभ्यास करून योग्य ती अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहचवत असते. प्रियंकाने बी कॉम आणि पत्रकारिता डिप्लोमा कोर्स केला असून ती ५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. एका स्थानिक मीडिया चॅनलमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून प्रियंकाने करिअरची सुरूवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स (डिजिटल) मध्ये भविष्य सेक्शनसाठी कन्टेन्ट रायटर म्हणून २ वर्ष काम केले आहे. प्रियंकाला फावल्या वेळेत वाचन करण्याची आणि कविता लिहिण्याची आवड आहे.

Whats_app_banner