Shani Amavasya Upay In Marathi : शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनि ग्रह दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलत असतो. शनि ग्रह सध्या कुंभ राशीत आहे, पण काही दिवसातच शनि ग्रह राशी बदलणार आहे. ज्या दिवशी शनि ग्रह आपली राशी बदलेल त्याच दिवशी शनि अमावस्याही असेल. यासोबतच याच दिवशी सूर्यग्रहणही होणार आहे. शनि अमावस्या हा शनिपूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. असा योगायोग क्वचितच पाहायला मिळतो. राशिचक्र बदल आणि ग्रहण सर्व राशींवर परिणाम करणार आहेत.
शनि अमावस्येच्या दिवशी शनीचे मीन राशीत संक्रमण होत आहे. या दिवशी शनीची साडेसाती आणि ढैयामध्येही बदल होईल. शनीच्या संक्रमणाने काही राशींच्या लोकांवर शनीची साडेसाती आणि ढैय्याचा परिणाम सुरू होईल तर काही राशीच्या लोकांना साडेसाती आणि ढैय्याच्या प्रभावातून मुक्ती मिळेल. शनि ग्रहाने मीन राशीत स्थानांतर केल्यामुळे शनीची साडेसाती मेष, कुंभ, मीन, धनु आणि सिंह राशीच्या लोकांवर परिणामकारक ठरेल.
शनिवार २९ मार्च रोजी शनी ग्रह राशी बदलत आहे आणि या दिवशी अमावस्याही आहे. ही अमावस्या म्हणजे शनि अमावस्या. या दिवशी शनिदेवाचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी उपाय केले जातात. या दिवशी शनीच्या साडेसाती आणि ढैय्याचा परिणाम कमी करण्यासाठी लोकांनी शनीदेवाची पूजा करावी तसेच शनीचा वाईट परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय करावेत, असे सांगितले जाते. यामुळे शनिदेव प्रसन्न होतो आणि शनिदोष कमी होतो.
या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केले जातात. या दिवशी अपराजिताची निळ्या रंगाची फुले शनिदेवाला अर्पण करावीत. याशिवाय या दिवशी पाण्यात साखर मिसळून ती पिंपळाच्या झाडाला शनिदेवासाठी अर्पण करावी आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा, यामुळे शनिदेवाची कृपा होते.
शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांनी दान करावे. शनि अमावस्येला शनिदेवाच्या मूर्तीला तेल, उडीद, तिळाचे धान्य, काळे कापड वगैरे अर्पण करावे. याशिवाय कुत्र्यांची सेवा करूनही शनिदेव प्रसन्न होतात. शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर गरिबांना मदत करावी. याशिवाय भगवान शिव आणि हनुमानाची पूजा केल्यानेही शनिदेव प्रसन्न होतात. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते असे सांगितले जाते.
संबंधित बातम्या