अंक शास्त्रानुसार प्रत्येक अंकांमध्ये एक विशिष्ट ऊर्जा आणि महत्व असते. त्यामुळेच हे अंक आपल्या आयुष्यावर उल्लेखनीय प्रभाव टाकत असतात. सर्वसामान्य लोकच नव्हे तर मोठमोठे सेलिब्रेटीसुद्धा अंकशास्त्रावर विश्वास ठेवतात. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा सुद्धा यामध्ये आवर्जून समावेश होतो.
शाहरुख खानचा कला क्षेत्रात असलेला दबदबा आपल्या सर्वांना माहितीच आहे. शाहरुख आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळेच त्याला बॉलिवूडचा किंग किंवा बादशहादेखील म्हटले जाते. शाहरुख आपल्या अभिनयासोबतच आलिशान लाइफस्टाइलसाठीसुद्धा ओळखला जातो. अभिनेत्याला महागड्या गाड्यांची आवड असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. शाहरुख खानच्या कलेक्शन मधील कार जितक्या खास असतात तितकेच त्या कारचे नंबरदेखील खास आहेत. आपण अंकशास्त्रावर विश्वास ठेवत असल्याचे काही इंटरव्युव्हमधून शाहरुखने मान्य केले होते.
शाहरुख खानच्या चाहत्यांना नेहमीच त्याच्या लाइफस्टाइलबाबत कुतुहूल असते. अभिनेत्याच्या एका रंजक गोष्टीबाबत सांगायचं झालं तर, त्याच्या बऱ्याच गाड्यांचा नंबर '५५५' हा असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार ५५५ हा शाहरुख खानचा लकी नंबर आहे. इतकेच नव्हे तर आपल्या मोबाईल नंबरमध्येसुद्धा शाहरुख या नंबरचा वापर करतो. त्याने एका मुलाखतीत खुलासा करत सांगितले होते की, पत्नी गौरी खान एक संख्याशास्त्र संबंधित पुस्तकाचे वाचन करीत होती आणि त्या पुस्तकामधून त्याच्यासाठी हा नंबर निवडला होता. नुकतंच शाहरुख खान आपल्या रोल्स रॉईज एसयूव्हीमधून प्रवास करताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. या महागड्या कारचा नंबरदेखील ५५५ असाच होता. ५५५ या नंबर मागे संख्याशास्त्र आहे. जाणून घ्या काय आहे अंक ज्योतिषनुसार याचे महत्व.
अंक जोतिषशास्त्रात '५५५' हा नंबर अतिशय खास आहे. या नंबरला अंकशास्त्रात देवदूत क्रमांक म्हटले जाते. या नंबरच्या प्रभावाने एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अध्यात्मिक प्रगती घडून येते. या नंबरचा प्रभाव एखाद्या व्यक्तीवर असेल तर तो व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या गोष्टींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यात सक्षम असतो. या क्रमांकाला स्वातंत्र्य, शौर्य, कर्तृत्व, आणि नेतृत्वचे प्रतीक समजले जाते. हे अंक लोकांचे नेतृत्व करते. त्यामुळे या अंकांचा वापर करणारे लोकसुद्धा लोकांचे नेतृत्व करण्यात सक्षम असतात. या क्रमांकचा वापर करणारे लोक नेहमीच सकारात्मक आणि कार्यशील वृत्तीचे असतात. तसेच या लोकांचा सर्वांगीण विकास घडून येतो. हे लोक नेहमीच यशाच्या शिखरावर पाहायला मिळतात.
संबंधित बातम्या