मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Shadashtaka Yoga : मंगळाचं संक्रमण या चार राशींना पडणार अत्यंत महागात, येणार वाईट दिवस
कुणाला भोवणार षडाष्टक योग
कुणाला भोवणार षडाष्टक योग (HT)

Shadashtaka Yoga : मंगळाचं संक्रमण या चार राशींना पडणार अत्यंत महागात, येणार वाईट दिवस

24 May 2023, 16:46 ISTDilip Ramchandra Vaze

Unlucky Zodiac Signs : ज्योतिषशास्त्रात मंगळ आणि शनि यांना शत्रू मानलं गेलं आहे. या दोघांच्या संयोगाने षडाष्टक योग तयार झाला आहे. षडाष्टक योग अत्यंत अशुभ मानला गेला आहे.

उर्जा आणि पराक्रमाचा ग्रह मंगळ १० मे रोजी कर्क राशीत प्रवेशकर्ता झाला आहे. तर शनि कुंभ राशीत आहे. मंगळ शनिच्या सहाव्या घरात आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ आणि शनि यांना शत्रू मानलं गेलं आहे. या दोघांच्या संयोगाने षडाष्टक योग तयार झाला आहे. षडाष्टक योग अत्यंत अशुभ मानला गेला आहे. ३० जूनपर्यंत मंगळ कर्क राशीत असेल आणि तोपर्यंत काही राशींच्या व्यक्तींसाठी अशुभ फल देणारा ठरणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कोणत्या राशींना षडाष्टक योगाचा फटका बसेल

कर्क रास

कर्क राशीत मंगळ असल्याने कर्क राशीच्या लोकांना जीवनात विविध चढउतारांना सामोरं जावं लागेल. या काळात तुम्हाला जीवनातील आर्थिक पैलूंबाबत अधिक काळजी घ्यावी लागेल. कर्क राशीच्या व्यक्तींनी ३० जूनपर्यंत कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळावी असा सल्ला त्यांना देण्यात येत आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कर्माचं फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही वाद टाळण्याचा प्रयत्न कराल पण त्यात अपयशी ठराल, तुमचे खर्च वाढतील आणि तुमची आर्थिक स्थिती खालावत जाईल.

धनु रास

धनु राशीच्या व्यक्तींनी गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. गुंतवणूकीसाठी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. अगदी जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. सावध राहा आणि तुमचं आर्थिक नुकसान टाळावं.

कुंभ रास

कुंभ राशीच्या व्यक्तींनी वाहन चालवताना काळजी घ्यावी. वाहन चालवताना तुम्हाला दुखापतीचं भय आहे. तुमची कोणतीही कामं अत्यंत लक्ष देऊन पूर्ण करा असा सल्ला देण्यात येतो. याशिवाय, प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुम्हाला तणावाचाही सामना करावा लागणार आहे.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग