मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sun and Saturn : ५० वर्षानंतर सूर्य आणि शनीचा षडाष्टक योग! 'या' राशींच्या अडचणी वाढणार, होणार आर्थिक हानि

Sun and Saturn : ५० वर्षानंतर सूर्य आणि शनीचा षडाष्टक योग! 'या' राशींच्या अडचणी वाढणार, होणार आर्थिक हानि

Jul 10, 2024 10:37 AM IST

Surya Shani Yuti 2024 : शनि आणि सूर्याचा तब्बल ५० वर्षांनी खास योग जुळून आला आहे. मात्र हा योग काही राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. या राशींना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पाहूया त्या राशी कोणत्या आहेत.

सूर्य आणि शनि ग्रहाचा राशींवर प्रभाव
सूर्य आणि शनि ग्रहाचा राशींवर प्रभाव

ज्योतिष शास्त्रात ग्रह अत्यंत महत्वाची भूमिका साकारत असतात. शास्त्रानुसार ग्रह एका ठराविक काळात आपले स्थान बदलत असतात. याकाळात ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर अर्थातच संक्रमण करतात. या गोचरमधून विविध सकारात्मक-नकारात्मक योगांची निर्मिती होते. या योगांचा पूर्ण प्रभाव राशीचक्रातील बाराही राशींवर पडत असतो. सांगायचे झाले तर, याच प्रभावातून राशींचे भविष्य ठरत असते. ग्रह गोचरमधून निर्माण झालेले योग काही राशींसाठी अशुभ असतात तर काही राशींसाठी अत्यंत शुभ असतात. सध्या जुलै महिना प्रारंभ झाला आहे. या महिन्यात विविध योग निर्माण होत आहेत.

ज्योतिष अभ्यासानुसार येत्या १६ जुलै २०२४ रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मात्र सूर्यापूर्वीच शनी कर्क राशीत विराजमान असणार आहे. या दोन ग्रहांच्या एकत्र येण्याने षडाष्टक नावाचा योग निर्माण होणार आहे. शनि आणि सूर्याचा हा योग तब्बल ५० वर्षांनी जुळून आला आहे. मात्र हा योग काही राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. या राशींना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पाहूया त्या राशी कोणत्या आहेत.

कर्क

शनि आणि सूर्याचा षडाष्टक योग कर्क राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. याकाळात तुमच्या आरोग्याच्या तक्रारी त्रास देतील. जुनाट आजार नव्याने उद्भवू शकतात. त्यामुळे तब्येतीची विशेष काळजी घ्या. काही गोष्टींमुळे मनावरचा तणाव वाढू शकतो. त्यामुळे मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात संघर्ष करावा लागेल. कामात वरिष्ठांचा दबाव जाणवेल. याकाळात कोणत्याही गोष्टीत पैशांची गुंतवणूक करणे टाळा. अथवा आर्थिक नुकसान होऊ शकतो. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. त्यामुळे रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवा.

सिंह

सिंह राशीच्या लोकांना षडाष्टक योगाचा त्रास सहन करावा लागणार आहे. याकाळात तुम्हाला विविध गोष्टींमुळे तणाव जाणवेल. हातात घेतलेल्या कामात अडचणी येतील. महत्वाची कामे रखडतील. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. एखाद्या प्रकरणात कोर्टाचा निर्णय तुमच्या विरोधात लागण्याची शक्यता आहे. आर्थिक चणचण भासेल. नोकरीत समस्या उद्भवतील. वरिष्ठांची बोलणी खावी लागेल. त्यामुळे चिडचिड होईल. याकाळात कोणतीही गोष्ट बोलण्यापूर्वी विचार करून बोला. अथवा वादविवाद-मतभेद होण्याची शक्यता आहे.

धनु

सूर्य आणि शनिच्या संयोगातून निर्माण झालेल्या षडाष्टक योगाचा नकारात्मक प्रभाव धनु राशीच्या लोकांवर पडणार आहे. याकाळात तुम्हाला गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल. विरोधकांच्या कुरघोड्यांनी त्रासून जाल. वाहन चालवताना सावधानी बाळगा. अथवा दुखापत होऊ शकते. व्यापारी वर्गाने किंवा कोणीही याकाळात पैशांची गुंतवणूक करणे टाळा. नाहीतर मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. शिवाय कोणालाही पैसे उधार देणे टाळा. तुमच्यावर कर्जाचे डोंगर होण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel