September Grah Gochar 2024 : ऑगस्ट महिना संपून आता सप्टेंबर महिना सुरू होईल. सप्टेंबर महिना ग्रह संक्रमणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे. या सप्टेंबर महिन्यात सूर्य, बुध आणि शुक्र त्यांच्या राशी बदलतील. सप्टेंबर सुरू होताच, बुद्धिमत्तेसाठी कारक असणारा बुध ग्रह संक्रमण करेल. त्यानंतर सूर्य संक्रमण होईल. यानंतर शुक्र ग्रह राशीपरिवर्तन करेल. त्याचबरोबर या महिन्यात बुधचे दोनदा भ्रमण होणार आहे. सप्टेंबरच्या शेवटी बुध पुन्हा राशीपरिवर्तन करेल.
सप्टेंबरमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र त्यांच्या राशी बदलतील आणि देश आणि जगावर तसेच मानवी जीवनावर परिणाम करतील. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्य सुमारे एका महिन्यात आपली राशी बदलतो, बुध कोणत्याही राशीमध्ये सुमारे २१ दिवस राहतो आणि शुक्र २६ दिवसांनी आपली राशी बदलतो.
ग्रहांचा राजा सूर्य, ग्रहांचा राजकुमार बुध आणि संपत्तीचा कारक शुक्र यांचा केव्हा आणि कोणत्या राशीत प्रवेश होणार आहे जाणून घ्या-
सूर्य सध्या स्वतःच्या राशीत सिंह राशीत विराजमान आहे आणि सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी कन्या राशीत प्रवेश करेल. १७ ऑक्टोबर पर्यंत सूर्य या राशीत राहील आणि त्यानंतर सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल. सूर्य संक्रमणाचा प्रभाव मेष ते मीन राशीचक्रातील सर्व राशींवर राहील.
ग्रहांचा राजकुमार बुध सध्या कर्क राशीत प्रतिगामी आहे. ४ सप्टेंबर रोजी बुध सिंह राशीत प्रवेश करेल. यानंतर सप्टेंबरमध्येच बुध दुसऱ्यांदा आपली राशी बदलेल. २३ सप्टेंबर रोजी बुध कन्या राशीत प्रवेश करेल. बुधाचे दुहेरी संक्रमण सर्व १२ राशींवर परिणाम करेल. १० ऑक्टोबरपर्यंत बुध तूळ राशीत विराजमान राहील.
धनाचा कारक शुक्र सध्या कन्या राशीत भ्रमण करत आहे. १८ सप्टेंबरला शुक्र तूळ राशीत प्रवेश करेल. शुक्र तूळ राशीत प्रवेश केल्यानंतर, सर्व १२ राशींना शुभ आणि अशुभ परिणाम देईल. १३ ऑक्टोबर पर्यंत शुक्र ग्रहाचे हे संक्रमण राहील त्यानंतर शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)