मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dream Interpretation : स्वप्नात स्वतःला हसताना पाहणे शुभ असतं की अशुभ?

Dream Interpretation : स्वप्नात स्वतःला हसताना पाहणे शुभ असतं की अशुभ?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jan 04, 2023 10:27 AM IST

Seeing Laughing In Dream : स्वप्नात हसताना पाहणे. कधी आपण स्वतःला हसताना पाहतो, कधी दुसऱ्याला हसताना पाहतो, कधी एकटेच हसतो, तर कधी कुणासोबत हसतो.काय असतो याचा अर्थ?

स्वप्नात स्वतःला हसताना पाहाणे
स्वप्नात स्वतःला हसताना पाहाणे (हिंदुस्तान टाइम्स)

आपण झोपेत अनेक प्रकारची स्वप्ने पाहतो, जसे कधी स्वप्नात रडताना दिसतात, तर कधी स्वप्नात काहीतरी खाताना दिसतात. आज आपण पाहाणार आहोत, स्वप्नात हसताना पाहणे. कधी आपण स्वतःला हसताना पाहतो, कधी दुसऱ्याला हसताना पाहतो, कधी एकटेच हसतो, तर कधी कुणासोबत हसतो. या स्वप्नांचा स्वतःचा अर्थ असतो, त्याचं आपलं असं एक शास्त्र असतं. ज्याचे आपल्याला शुभ किंवा अशुभ परिणाम मिळतात.

स्वप्नात स्वतःला हसताना पाहाणे

स्वप्नात स्वतःला हसताना पाहणे शुभ मानले जात नाही, जर तुम्ही स्वप्नात स्वतःला हसताना दिसले तर हे स्वप्न सूचित करते की नजीकच्या भविष्यात तुम्ही संकटात सापडू शकता. म्हणूनच तुम्ही सतर्क राहिले पाहिजे.

 

स्वप्नात इतर कोणीतरी आपल्याला हसवताना पाहाणे

जर एखाद्या स्वप्नात तुम्हाला इतर कोणी हसवत असेल तर ते एक शुभ स्वप्न आहे, जे आगामी काळात तुमच्या इच्छा पूर्ण होणार असल्याचे सूचित करते. तुमची काही जुनी इच्छा आहे जी पूर्ण होणार आहे, हे स्वप्न एक संकेत देते.

स्वप्नात स्त्रीला हसताना पाहाणे

स्वप्नात स्त्रीला हसताना पाहणे, हे स्वप्न देखील शुभ नाही. हे स्वप्न सूचित करते की तुमच्या घरात काही वाद होणार आहेत. हे स्वप्न पाहिल्यानंतर तुम्ही सावध राहावे आणि अनावश्यक वाद टाळावेत.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग