मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dream Interpritation : स्वप्नात चंद्र पाहाण्याचा काय असतो अर्थ?

Dream Interpritation : स्वप्नात चंद्र पाहाण्याचा काय असतो अर्थ?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jan 25, 2023 10:33 AM IST

See Moon In Dream : प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी एक अर्थ असतो. आज आपण बोलणार आहोत अशाच एका स्वप्नाविषयी. काही व्यक्ती स्वप्नात चंद्र पाहातात. मग स्वप्नात चंद्र पाहाण्याचा काय असतो अर्थ.

स्वप्नात चंद्र पाहाण्याचा काय असतो अर्थ
स्वप्नात चंद्र पाहाण्याचा काय असतो अर्थ (हिंदुस्तान टाइम्स)

Dream Interpritation See Moon In Dreams

रात्री झोपल्यावर आपण काही ना काहीतरी स्वप्न पाहातच असतो. एखाद्या व्यक्तीला काही गोष्टींबाबत तणाव असेल तर त्याला तशी स्वप्न पडतात. एखादी व्यक्ती अत्यंत आनंदी असेल तर त्याला आनंदी जीवन दर्शावणारी स्वप्न पडतात. मात्र कधी एखाद्या व्यक्तीला काहीतरी वेगळंच स्वप्न पडतं आणि मग ती व्यक्ती त्या स्वप्नाविषयी विचार करु लागते.कधीकधी आपल्याला पडणाऱ्या विचित्र स्प्नामुळे आपली झोपमोडही होते. प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी एक अर्थ असतो. आज आपण बोलणार आहोत अशाच एका स्वप्नाविषयी. काही व्यक्ती स्वप्नात चंद्र पाहातात. मग स्वप्नात चंद्र पाहाण्याचा काय असतो अर्थ. चला जाणून घेऊया.

स्वप्नात पूर्णचंद्र किंवा पौर्णिमा पाहाणे

स्वप्नात पौर्णिमा पाहणे खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तसेच तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. जर तुमचे कुटुंबातील कोणाशी वाईट संबंध असतील तर ते सुधारू शकतात. हे स्वप्न आनंद आणि समृद्धीमध्ये वाढ दर्शवते. असे स्वप्न तुमच्या नोकरीत बढती आणि वाढ दर्शवते. या काळात तुम्ही परदेशातही प्रवास करू शकता.

स्वप्नात अर्धचंद्र पाहाणे

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात अर्ध चंद्र दिसणे खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला अचानक फायदा होऊ शकतो. यासोबतच जे व्यावसायिक आहेत त्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. दुसरीकडे, जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नोकरी मिळू शकते. तसेच तुम्ही प्रवास करू शकता, जे फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला कोणत्याही योजनेत यश मिळू शकते.

स्वप्नात लाल चंद्र पाहाणे

स्वप्नात लाल चंद्र दिसणे अशुभ मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला काही अशुभ माहिती मिळू शकते. त्याच वेळी याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पैशाशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच असे स्वप्न पाहिल्यानंतर आयुष्यात वाद वाढू शकतात.

स्वप्नात तुटलेला चंद्र पाहाणे

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात तुटलेला चंद्र दिसला तर ते अशुभ लक्षण आहे. याचा अर्थ आगामी काळात तुमचा कोणाशी तरी वाद होऊ शकतो. तसेच, हे तुमच्यासाठी नोकरी गमावण्याची चिन्हे देखील असू शकतात. तसेच तुम्हाला धनहानी होऊ शकते. अपघातही संभवतात.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

 

WhatsApp channel

विभाग