मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Astro Tips For Healthy Home : घराच्या मुख्य दरवाज्यावर संध्याकाळी दिवा लावण्यामागे काय आहे कारण

Astro Tips For Healthy Home : घराच्या मुख्य दरवाज्यावर संध्याकाळी दिवा लावण्यामागे काय आहे कारण

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 11, 2023 03:11 PM IST

Vastu Tips : घराच्या मुख्य दरवाज्यावर रोज संध्याकाळी दिवा लावावा असं सांगितलं जातं

घराच्या मुख्य दरवाज्यावर संध्याकाळी का लावावा दिवा
घराच्या मुख्य दरवाज्यावर संध्याकाळी का लावावा दिवा (Housing)

सनातन धर्मात सूर्योदयानंतर आणि सुर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी कराव्यात याची माहिती देण्यात आली आहे. सुर्योदयानंतर देवघरात दिवा लावावा आणि देवाचा आशिर्वाद घ्यावा, सूर्यास्तानंतर घराच्या उंबरठ्यावर दिवा लावावा असं सांगण्यात आलं आहे. घराच्या मुख्य दरवाज्यावर रोज संध्याकाळी दिवा लावावा असं सांगितलं जातं. मग त्यामागचं ज्योतिषीय कारण काय आहे हे आपण जाणून घेऊया.

माता लक्ष्मी होते प्रसन्न

धार्मिक मान्यतेनुसार संध्याकाळी मुख्य गेटवर नियमितपणे दिवा लावल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरात तिचे आगमन होते. त्यामुळे माणसाची आर्थिक स्थिती मजबूत राहते.

राहूचे दुष्परिणाम कमी होतात

ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरामध्ये संध्याकाळी मुख्य दारावर नियमित दिवा लावला जातो. त्या घरातील सदस्यांच्या कुंडलीत राहूचा अशुभ प्रभाव कमी होऊ शकतो. घरातील नकारात्मकता दूर करते आणि सकारात्मकतेचा संवाद वाढवते

सकारात्मक ऊर्जा वाढते

प्रचलित समजुतीनुसार, ज्या घरात संध्याकाळी मुख्य दारावर नियमितपणे दिवा लावला जातो, तेथे नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही. सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील वातावरण प्रसन्न होते.

गरिबी दूर होते

असे म्हणतात की ज्या घराच्या मुख्य दारावर नियमित दिवे लावले जातात त्या घरात गरिबी नसते. सुख-समृद्धी टिकून राहते आणि रोग व दुःखापासून मुक्ती मिळते.

काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

शास्त्रज्ञांच्या मते, घराच्या मुख्य दरवाजावर नियमित दिवा लावल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते. तेथे कोणतेही हानिकारक कीटक आणि पतंग येत नाहीत.

दिवा कुठे लावायचा

धार्मिक ग्रंथानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला नेहमी दिवा ठेवणे शुभ मानले जाते. हा दिवा तुम्ही तुप किंवा तेलाचा लावू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग