वैदिक शास्त्रानुसार जोतिषीय अभ्यासात नवग्रहांना विशेष स्थान आहे. त्याचप्रमाणे शनि आणि मंगळ या ग्रहांनादेखील अनन्यसाधारण महत्व आहे. या ग्रहांच्या हालचालींमुळे अतिशय महत्वाचे योग आणि तिथी निर्माण होत असतात. त्यांचा प्रभाव राशीचक्रातील बाराही राशींवर पडत असतो. काही राशींसाठी हा प्रभाव नकारात्मक असतो तर काही राशींसाठी प्रचंड सकारत्मक असतो. दरम्यान शनिदेव आणि मंगळ काही राशींवर एकत्र शुभ प्रभाव टाकणार आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आपल्या ठराविक कालावधीत राशीपरिवर्तन करत असतात. दरम्यान १ जून २०२४ रोजी मंगळ ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला होता. येत्या १२ जुलै २०२४ पर्यंत मंगळ मेष राशीतच विराजमान असणार आहे. तसेच मंगळ मेष राशीत विराजमान असल्याने शनिदेवाची तिसरी दृष्टी मंगळ देवावर पडत आहे. यातून राशीचक्रातील काही राशींना शुभ लाभ मिळणार आहे. या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.
मंगळवर असणाऱ्या शनिदेवाच्या शुभ दृष्टीचा फायदा मेष राशीच्या लोकांसुद्धा मिळणार आहे. शिवाय मंगळ मेष राशीमध्येच विराजमान असलयाने या राशीला
दुहेरी लाभ होईल. याकाळात तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य उत्तम राहील. उद्योग-व्यापारात प्रगतीचे नवे मार्ग तुम्हाला सापडतील. मात्र कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्या. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. त्यांच्या सहवासात वेळ चांगला जाईल. मनासारख्या गोष्टी घडत असल्याने मन उत्साही राहील.
मंगळदेव आणि शनिदेव मिथुन राशीच्या लोकांसुद्धा विशेष लाभ देणार आहेत. याकाळात कामावर लक्ष केंद्रित केल्यास निश्चितच मोठे यश पदरात पडणार आहे. जुने रोग दूर होऊन आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभ सामान्य असणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग जुळून येईल. धार्मिक-अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याकाळात चांगले यश मिळणार आहे.
मंगळ आणि शनि कन्या राशीच्या लोकांवरसुद्धा शुभ प्रभाव टाकणार आहेत. याकाळात तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. त्यामुळे मनावरचा ताण नाहीसा होईल. कार्यक्षेत्रात अपेक्षेपेक्षा अधिक यश आणि प्रसिद्धी मिळेल. उत्तम धनलाभसुद्धा होईल. कला क्षेत्रात रुची वाढेल. कलात्मक-रचनात्मक पद्धतीने काम करण्याची इच्छा होईल. व्यवसायिकांसाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. मानसन्मान वाढेल. अचानक एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न होईल.