मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Rose Day : राशीनुसार गुलाबाचा रंग निवडा आणि नात्यातील गोडवा व प्रेम वाढवा

Rose Day : राशीनुसार गुलाबाचा रंग निवडा आणि नात्यातील गोडवा व प्रेम वाढवा

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 06, 2024 06:27 PM IST

Rose Day 2024 Astrological prediction : व्हॅलेंटाइन विक सुरु होतो आहे. ७ ते १४ फेब्रुवारी पर्यंत प्रेमीयुगलांसाठी विविध दिवस साजरे करण्याचा असतो. रोज डे ने या व्हॅलेंटाइन सप्ताहाला सुरवार होते. जाणून घ्या राशीनुसार कोणत्या रंगाचं गुलाब निवडायला हवं.

Rose Day 2024 Astrological prediction
Rose Day 2024 Astrological prediction

फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हणतात. कारण प्रेमीयुगलांचा व्हॅलेंटाइन विक याच महिन्यात असतो. ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाइन सप्ताह साजरा केला जाईल. रोज डे पासून व्हॅलेंटाइन सप्ताहाला सुरवात होते. ज्योतिषशास्त्रात व वास्तुशास्त्रातही गुलाबाला खास महत्व दिले आहे. गुलाबाला प्रेमाचे प्रतिक मानतातच परंतू, गुलाबामुळे वैवाहिक, कौटुंबीकसह, आर्थिक अडचणीही दूर होतात. रोज डे निमीत्त जाणून घ्या आपल्या प्रेमातील गोडवा वाढवायचा असल्यास राशीनुसार कोणते गुलाब निवडावे ते जाणून घ्या.

मेष

मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळाचा रंग लाल असून, या राशीच्या व्यक्तींना लाल गुलाब भेट द्यावे. तुमच्या नात्यावरही लाल रंग चढेल आणि तुमचे प्रेम वाढेल.

वृषभ

वृषभ राशीचा स्वामी ग्रह प्रेमाचा कारक शुक्र ग्रह आहे. या राशीच्या व्यक्तीला गुलाब देताना गुलाबी रंगाचे गुलाब द्यावे. तुमच्या नात्यातही या गुलाबाचा गंध दरवळेल.

मिथुन

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. या राशीच्या तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीला पिवळे आणि लाल रंगाचे गुलाब भेट देऊ शकतात.

कर्क

कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. या राशीच्या व्यक्तीला पांढरे आणि लाल रंगाचा गुलाब देऊन तुमचे प्रेम व्यक्त करू शकतात.

सिंह

सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला केशरी आणि लाल गुलाब भेट देऊ शकतात. यामुळे तुमच्या नात्यातील अंतर कमी होईल.

कन्या

कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. या राशीच्या व्यक्तीस पिवळा आणि गुलाबी गुलाब देऊन तुमच्या नात्याला फुलवू शकतात.

तूळ

तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. नात्याला नाव मिळावे आणि प्रेम वाढावे असे वाटत असेल तर या राशीच्या व्यक्तीस गडद लाल रंगाचे गुलाब भेट द्या.

वृश्चिक

वृश्चिक राशीचा स्वामी ग्रहही मंगळ आहे. या राशीच्या तुमच्या प्रेयसी/प्रियकराला लाल किंवा गुलाबी रंगाचे गुलाब भेट देऊन, प्रेम जीवन रोमांचक बनवा.

धनु

धनु राशीचा स्वामी ग्रह गुरु/बृहस्पती आहे. तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी या राशीची असेल तर केशरी किंवा पिवळे गुलाब भेट द्या.

मकर

मकर राशीचा स्वामी ग्रह शनि आहे.रोज डे च्या दिवशी या राशीच्या व्यक्तिला लाल आणि निळ्या रंगाचे गुलाब भेट देऊन प्रेम वाढवा.

कुंभ

कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनि, युरेनस आहे. रोज डे ला तुमच्या जोडीदार या राशीचा असेल तर, पांढऱ्या गुलाबाचा पुष्पगुच्छ आणि लाल गुलाब भेट द्या.

मीन

मीन राशीचा स्वामी ग्रह नेपच्युन आहे. या राशीच्या व्यक्तिच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी आणि होकार मिळवण्यासाठी केशरी आणि पिवळ्या गुलाबाच्या फुलाची निवड करा.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)