मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Budh And Shukra Gochar : ग्रहांचा राजा बुध आणि धन दाता शुक्र लवकरच होणार उदय! 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस

Budh And Shukra Gochar : ग्रहांचा राजा बुध आणि धन दाता शुक्र लवकरच होणार उदय! 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस

Jun 20, 2024 09:56 AM IST

Budh And Shukra Gochar : ज्योतिषअभ्यासानुसार ग्रहांचा राजा बुध आणि धन दाता शुक्र लवकरच उदय होणार आहेत. या ग्रहांच्या उदयाने अनेक शुभ योग जुळून येणार आहेत.

बुध आणि शुक्र ग्रह
बुध आणि शुक्र ग्रह

वैदिक शास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी उदय आणि अस्त होत असतात. ग्रहांच्या या उदय-अस्तांच्या प्रक्रियेचा परिणाम मानवी आयुष्यावरदेखील पडत असतो. शास्त्रानुसार कुंडलीतील ग्रहांच्या लहान-मोठ्या हालचालींवरुन मानवी आयुष्यात मोठमोठे बदल घडून येत असतात. त्यामुळे ग्रहांची प्रत्येक चाल महत्वाची समजली जाते. ज्योतिषअभ्यासानुसार ग्रहांचा राजा बुध आणि धन दाता शुक्र लवकरच उदय होणार आहेत. या ग्रहांच्या उदयाने अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. या शुभ योगांचा फायदा राशीचक्रातील काही राशींना मिळणार आहे.

नवंग्रहांमध्ये बुध हा एक अत्यंत महत्वाचा ग्रह आहे. वास्तविक बुधला ग्रहांचा राजा म्हणून संबोधले जाते. बुधला बुद्धी, ज्ञान, व्यापार, वाणी याचे कारक म्हटले जाते. त्यामुळे या ग्रहाचा शुभ प्रभाव ज्या राशीवर असेल ती राशी नशीबवान समजली जाते. येत्या २३ जून २०२४ रोजी बुध उदय होणार आहे. विशेष म्हणजे बुध आपली स्वराशी मिथुनमध्ये उदयास येणार आहे. तर दुसरीकडे धन दाता शुक्र २८ जून २०२४ रोजी मिथुन राशीतच उदय होणार आहेत. अशाने मिथुन राशीत बुध आणि शुक्र यांचा शुभ संयोग दिसून येणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या उदयाने अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. या शुभ योगात राशी चक्रातील अनेक राशींना फायदा होणार आहे. पाहूया त्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.

वृषभ

बुध आणि शुक्र उदय वृषभ राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. महत्वाचे म्हणजे हे दोन्ही ग्रह या राशीच्या धन आणि वाणी भावावर उदयास येत आहेत. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होतील. हातात पैसा आल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. घरात ऐषाराम देणाऱ्या गोष्टींमध्ये वाढ होईल. कार्यक्षेत्रात तुमचा नावलौकिक वाढेल. तुमच्या मितभाषी स्वभावाने लोकांना तुमची भुरळ पडेल. समाजात तुमचे व्यक्तिमत्व आणखी उठून दिसेल. व्यापाऱ्यांना अडकलेले पैसे परत मिळतील. त्यामुळे मनाला समाधान लाभेल. नवीन व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असणाऱ्याना हा काळ अतिशय शुभ आहे. आर्थिक गुंतवणूकीतून फायदाच होईल.

मिथुन

लवकरच होणार बुध आणि शुक्र ग्रहांचा उदय मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. या शुभ संयोगाचा पुरेपूर फायदा या राशीच्या लोकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही ग्रह या राशीच्या लग्न भावात असणार आहेत. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व आणखीन खुलेल. तुमच्या वाणीत गोडवा आल्याने अनेक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. व्यवसाय-उद्योग करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. गुंतवणुकीतून चांगला आर्थिक फायदा मिळेल. त्यामुळे व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी येईल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होऊन नाते आणखी मजबूत होईल. एकंदरीत हा संयोग मिथुन चमकवणार आहे.

सिंह

बुध शुक्र यांच्या उदयाचा शुभ प्रभाव सिंह राशीच्या लोकांवरसुद्धा पडणार आहे. कारण हे दोन्ही ग्रह सिंह राशीच्या कमाईच्या भावावर उदय होणार आहेत. त्यामुळे याकाळात सिंह राशीच्या लोकांच्या कमाईत प्रचंड वाढ होईल. नोकरदार वर्गाचे पगार अचानक वाढतील. तसेच कमाईचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. अनेपक्षित मार्गाने धन प्राप्त झाल्याने आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल जाणवेल.व्यवसायिकांना नवे व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळेल. नोकरदारवर्गाची कार्यक्षेत्रात वेगाने प्रगती होईल. तुमच्या कामावर वरिष्ठ खुश होतील. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. आर्थिक गुंतवणुकीतूनसुद्धा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel