Red Coral Gemstone: रत्नशास्त्रानुसार कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि राशीनुसार रत्ने परिधान करावीत. प्रत्येक रत्नाचे स्वतःचे नियम असतात, ते पाळणे गरजेचे असते. लाल रंगाचे रत्न मूंगा आहे, जे मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. मूंगा रत्न योग्य त्या विधीनुसार आणि योग्य पद्धतीने परिधान केल्यास मंगळ बळकट होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाचा संबंध पराक्रम, धैर्य, ऊर्जा, रक्त, भाऊ, युद्ध, सैन्य आणि जमीन यांच्याशी आहे. मूंगा रत्न धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो. चला जाणून घेऊ या, मूंगा कोणी, केव्हा आणि कोणत्या पद्धतीने घालावे -
मंगळाशी संबंधित असल्याने मंगळवारी मूंगा धारण करणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर ते परिधान करण्यापूर्वी शुद्धीकरण करणे आवश्यक मानले जाते.
मूंगा रत्न तांबे, सोने किंवा चांदीच्या अंगठीत घालून परिधान केले जाऊ शकते. मंगळवारी गंगेच्या पाण्याने आणि कच्च्या दूधाने प्रथम मूंगा रत्नाची शुद्धी करून घ्यावी. हे रत्न अंगठीच्या बोटात परिधान करावे. ७-८ रती असलेले मूंगा रत्न धारण करणे शुभ मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार मूंगा रत्नाचा संबंध मंगळ ग्रहाशी आहे. त्यामुळे मंगळाच्या मेष आणि वृश्चिक राशीचे लोक हे रत्न धारण करू शकतात. यासोबतच लग्नात सिंह, धनु किंवा मीन राशी असेल तर तुम्ही मूंगा धारण करू शकता. कुंडलीत मांगलिक दोष असला तरी मूंगा रत्न घालता येतो.
दुसरीकडे जर तुमची राशी मकर किंवा धनु राशीची असेल तर तुम्ही मूंगा हे रत्न घालणे टाळावे. रत्नाविद्येनुसार,हिरा मूंगा रत्नासह घालू नये. त्याचबरोबर मूंगा परिधान करण्यापूर्वी आपल्या ग्रहांची स्थिती अवश्य पाहावी आणि ज्योतिषाचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
रत्नशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग समजला जातो. रत्न शास्त्रामध्ये रत्नांची माहिती देण्यात येते, तसेच कोणत्या ग्रहाला बळ देण्यासाठी कोणते रत्न धारण करावे हे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक रत्नाचा संबंध एखाद्या ग्रहाशी असतो. रत्न धारण केल्याने ग्रह-तारे यांच्या प्रभावापासून आराम मिळतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या