हिंदू धर्मात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी नक्षत्र शुभ असणे आवश्यक असते. या शुभ कार्यांमध्ये नक्षत्रांची पूर्ण काळजी घेतली जाते. वैदिक शास्त्रानुसार एकूण २७ नक्षत्र अस्तित्वात आहेत. या नक्षत्राचे प्रत्येकाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. यामधील आठव्या क्रमांकाचे नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र होय. शास्त्रानुसार या नक्षत्राला प्रचंड शुभ समजले जाते.
राशी आणि मूलांकाप्रमाणेच नक्षत्राचासुद्धा एक स्वामी ग्रह असतो. त्यानुसार पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह गुरु आहे. गुरु हा सर्वात शुभ ग्रह असल्याने पुष्य नक्षत्रसुद्धा शुभ प्रभावात असते. पुष्य नक्षत्राच्या मदतीने एक प्रचंड शुभ योगाची निर्मिती होते. हा योग म्हणजे रवि पुष्य नक्षत्र योग होय. या योगात केलेले कोणतेही काम दुप्पट फायदा देणारे ठरते. शिवाय याकाळात अनेक चांगल्या खरेदी केल्या जातात. उद्या रविवार ७ जुलै रोजी हा रवि पुष्य योग निर्माण होत आहे. पाहूया या योगाचे महत्व आणि तिथी.
हिंदू धर्मानुसार रवि पुष्य नक्षत्र सर्वात शुभ समजला जातो. याकाळात अनेक शुभ कार्ये केली जातात. शिवाय सोने-चांदीसारख्या महागड्या वस्तूंची आवर्जून खरेदी केली जाते. हिंदू पंचांगानुसार, यंदा रवि पुष्य नक्षत्र रविवार ७ जुलै २०२४ रोजी असणार आहे. अवघ्या २० तासांनी हे नक्षत्र प्रारंभ होईल. रविवारी पहाटे ५ वाजून २९ मिनिटांनी हे नक्षत्र प्रारंभ होईल. तर दुसऱ्या दिवशी ८ जुलै रोजी पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी हे नक्षत्र समाप्त होईल. वैदिक शास्त्रानुसार यंदा दोनवेळा या नक्षत्राचा लाभ मिळणार आहे. जुलैनंतर ऑगस्ट महिन्यातसुद्धा रवि पुष्य नक्षत्राचा शुभ योग जुळून येत आहे.
२७ नक्षत्रांच्या यादीतील ७ वे नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र होय. या नक्षत्राचा स्वामी ग्रह अत्यंत शुभ समजला जाणार गुरु ग्रह असतो. त्यामुळे या नक्षत्रावरसुद्धा अतिशय शुभ असतो. या नक्षत्राला सर्वात शुभ नक्षत्र समजले जाते. कुंडलीतील ग्रहांची स्थिती कमजोर असेल परंतु पुष्य नक्षत्र अनुकूल स्थितीत असल्यास सर्वकाही सुरळीत होते. पुष्य नक्षत्रापासून तयार होणारा योग रविवारी येत असेल तर त्याला रवि पुष्य नक्षत्र म्हटले जाते. हा नक्षत्र गुरुवारी असेल तर त्याला गुरु पुष्य नक्षत्र असे संबोधले जाते. यादिवशी नवीन व्यवसाय सुरु करण्यापासून, खरेदीपर्यंत आणि आध्यत्मिक कार्यांपर्यंत सर्व गोष्टी करणे शुभ समजले जाते.
रवि पुष्य नक्षत्रात विविध प्रकारचे शुभ कार्य करणे उत्तम असते. यादिवशी सोने-चांदीची खरेदी करा. स्थावर मालमत्तेत आर्थिक गुंतवणूक केल्यास प्रचंड लाभ मिळेल. वाहन, घर खरेदी केल्यास तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि धनसंपदा येईल. यादिवशी पूजापाठ करण्यासोबतच गौमातेला गूळ खायला घालणे अत्यंत शुभ आणि फलदायी असते.
संबंधित बातम्या