Ratna Jyotish: 'या' ३ राशीच्या लोकांनी चुकूनही धारण करू नका 'ही' अंगठी! दिसतील अशुभ परिणाम
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Ratna Jyotish: 'या' ३ राशीच्या लोकांनी चुकूनही धारण करू नका 'ही' अंगठी! दिसतील अशुभ परिणाम

Ratna Jyotish: 'या' ३ राशीच्या लोकांनी चुकूनही धारण करू नका 'ही' अंगठी! दिसतील अशुभ परिणाम

Published Aug 10, 2024 04:57 PM IST

Ratna Jyotish: ज्योतिषशास्त्रात वास्तू, राशी, अंक, आणि रत्न असे विविध शास्त्र आहेत. त्यामुळेच अनेक लोक आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींमध्ये रत्नशास्त्राचा आधार घेतात.

Ratna Jyotish
Ratna Jyotish

Ratna Jyotish:  हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला प्रचंड महत्व आहे. ज्योतिषशास्त्रात वास्तू, राशी, अंक, आणि रत्न असे विविध शास्त्र आहेत. त्यामुळेच अनेक लोक आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींमध्ये रत्नशास्त्राचा आधार घेतात. याच रत्न शास्त्रात मुंगा या रत्नाला खूप महत्त्व आहे. या रत्नाचा रंग लाल असून तो मंगळ ग्रहाचा प्रतिनिधी मानला जातो. हे रत्न समुद्रात असणाऱ्या प्राण्यांपासून मिळते आणि ते धारण करण्याचे असंख्य फायदे रत्नशास्त्रात सांगण्यात आले आहेत. मंगळ दोषामुळे आयुष्यात अनेक अडचणी येत असतील तर हे रत्न धारण केल्याने दोष दूर होतात, असा समज आहे.

मुंगा रत्न तुम्हाला आयुष्यातील प्रतिकूल परिस्थिती आणि अडथळ्यांमध्ये दिलासा देते. एखाद्याच्या विवाहात अडथळा येत असेल, तर या रत्नाच्या सहाय्याने तो दूर होतो. तुम्ही अनेक लोकांना हे रत्न घातलेले पाहिलं असेल, पण तुम्हाला माहीत आहे का की, अनेक राशीच्या लोकांसाठी हे रत्न अशुभ मानले जाते. चला जाणून घेऊया त्या राशी नेमक्या कोणत्या आहेत.

वृषभ-

राशीचक्रातील बारा राशींपैकी दुसऱ्या क्रमांकाची राशी म्हणजे वृषभ होय. या राशीच्या लोकांवर शुक्राचा प्रभाव असतो. तर दुसरीकडे मुंगा हे रत्न मंगळाचे प्रतिनिधित्व करते. अशा स्थितीत दोघांची ऊर्जा वेगळी असते. ज्यामुळे तुम्हाला विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात. जर तुमच्या कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली असेल तर तुम्ही ते परिधान करू शकता.

मिथुन-

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. बुध हा ग्रह बुद्धिमत्ता, संवाद, व्यवसाय आणि वाणीचा कारक मानला जातो. त्यामुळे या राशीचे लोक बहुतांशी हुशार आणि बुद्धिमान असतात. तर मुंगा रत्नावर मंगळाचा जास्त प्रभाव असतो. त्यामुळे या राशीच्या लोकांनीदेखील मुंगा रत्न घालणे टाळावे.

कुंभ

कुंभ या राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. तर मुंगा रत्न मंगळाचे प्रतिनिधित्व करते. आणि त्यावर मंगळाचा प्रभाव अधिक असतो. अशा स्थितीत दोन्ही ग्रहांची ऊर्जा भिन्न असते आणि त्यामुळे तुम्हाला मुंगा रत्न धारण करून त्याच्या अशुभ प्रभावांना सामोरे जावे लागू शकते. ज्यामुळे महत्वाच्या कामात अपयश येण्यासारखे प्रसंग येऊ शकतात. त्यामुळे शक्यतो ज्योतिषांच्या सल्ल्यानेच रत्न धारण करावे.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner