Gemstone For Prosperity In Marathi : रत्न ज्योतिषशास्त्रात नवीन सुरुवात आणि सुखी जीवनासाठी क्वार्ट्झ, अमेथिस्ट, सिट्रिन आणि मूनस्टोनसह अनेक रत्नधारण करणे फायदेशीर मानले जाते. मान्यतेनुसार हे रत्न धारण केल्याने ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो. जीवनात समतोल राखला जातो आणि आव्हानांवर मात करता येते. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात नवी सुरुवात करायची असेल तर तुम्ही काही रत्ने परिधान करू शकता. मात्र ज्योतिषीय सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही रत्न धारण करू नये. चला जाणून घेऊया सुख-शांती आणि आनंदासाठी कोणते रत्न धारण करावे त्या रत्नांबद्दल…
क्वार्ट्झ : जीवनातील नकारात्मकता आणि मानसिक ताण दूर करण्यासाठी क्वार्ट्झ स्टोन परिधान करणे फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की, हे रत्न मनाला सुख आणि शांती प्रदान करते. हे रत्न धारण करण्याआधी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. यानंतर हे रत्न परिधान करता येते. मान-सन्मान वाढीसाठी आणि धनलाभासाठी हे रत्न प्रभावी मानले जाते. हे रत्न हार किंवा ब्रेसलेट मध्ये टाकून देखील परिधान केले जाऊ शकते.
अमेथिस्ट : तणाव आणि मानसिक शांतीसाठी अमेथिस्ट रत्न धारण करणे सर्वात फायदेशीर मानले जाते. हे रत्न नवीन सुरुवात आणि सुख-शांतीसाठी विशेष लाभ देऊ शकते. ज्योतिषीय सल्ला योग्य पद्धतीने घेऊन अमेथिस्ट धारण केल्याने सुख, समृद्धी, धन, ऐश्वर्य आणि सन्मान मिळतो, असे मानले जाते.
सिट्रिन : जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदासाठी सिट्रिन रत्न देखील परिधान केले जाऊ शकते. मान्यतेनुसार हे रत्न धारण केल्याने प्रेरणा आणि यश मिळते. जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे रत्न शुभ असल्याचे मानले जाते. हे रत्न धारण केल्याने जीवनात भौतिक सुखसोयींची कमतरता भासत नाही.
मूनस्टोन : नवीन सुरुवात आणि सकारात्मक ऊर्जेसाठी मूनस्टोन रत्न धारण करणे देखील फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की, मून स्टोन धारण केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. जे लोक कमकुवत आत्मविश्वासासह मानसिक तणावाला सामोरे जात आहेत असे लोक ज्योतिषीय सल्ला घेऊन मूनस्टोन परिधान करू शकतात.
संबंधित बातम्या