मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Astrological Prediction About Nature : राशीवरुन ओळखता येतो व्यक्तीचा स्वभाव! हे आहेत प्रत्येक राशींचे गुणदोष

Astrological Prediction About Nature : राशीवरुन ओळखता येतो व्यक्तीचा स्वभाव! हे आहेत प्रत्येक राशींचे गुणदोष

May 24, 2024 10:20 PM IST

Astrological Prediction About Nature : जोतिषशास्त्रात एकूण १२ राशी अस्तित्वात आहेत. शास्त्रानुसार राशी फक्त भविष्यच सांगत नाहीत तर लोकांचे स्वभाव आणि गुणदोषसुद्धा सांगतात. तुमच्या राशींवरून तुमचा स्वभाव कसा आहे याबाबत जाणून घ्या.

Today Horoscope: ஜூலை 27 ம் தேதி, 12 ராசிகளுக்கான பலன்களை ஒவ்வொன்றாக பார்க்கலாம்
Today Horoscope: ஜூலை 27 ம் தேதி, 12 ராசிகளுக்கான பலன்களை ஒவ்வொன்றாக பார்க்கலாம்

बऱ्याच लोकांना राशिभविष्य, अंकभविष्य, कुंडली या गोष्टींवर विश्वास नसतो. परंतु तरीसुद्धा हे लोक अगदी सहज का होईना राशिभविष्यवर नजर टाकतातच. तर दुसरीकडे अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात राशिभविष्य पाहूनच करतात. अंकभविष्याप्रमाणेच राशीभविष्यसुद्धा तितकेच प्रभावी असते. जोतिषशास्त्रात एकूण १२ राशी अस्तित्वात आहेत. शास्त्रानुसार राशी फक्त भविष्यच सांगत नाहीत तर लोकांचे स्वभाव आणि गुणदोषसुद्धा सांगतात.

राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव वेगळे असते असे जोतिष अभ्यासात दिसून आले आहे. काही राशींचे लोक रागीट असतात तर काही राशींचे लोक अतिशय मितभाषी असतात. बहुतांश लोक आपल्या दैनंदिन आयुष्यात राशीभविष्यला विशेष महत्व देतात. विशेष म्हणजे ग्रह-नक्षत्रांच्या स्थान बदलांचा परिणाम या राशींवर होत असतो. ग्रह-नक्षत्र एक ठराविक वेळेनंतर राशिपरिवर्तन करत असतात. ग्रहांच्या या हालचालींवरून राशींचे भविष्य ठरवले जाते. तुमच्या राशींवरून तुमचा स्वभाव कसा आहे याबाबत जाणून घ्या.

मेष 

राशीचक्रातील पहिली राशी मेष होय. मेष राशीच्या लोकांचा स्वभाव अतिशय चंचल असतो. या लोकांना एका ठिकाणी स्थिर राहणे कठीण जाते. त्यांना कोणत्याही गोष्टीत मन एकाग्र करणे फारसे जमत नाही. परंतु या लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये कुतूहल वाटत असते. त्यांना प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन संशोधन करणे पसंत असते. शास्त्रानुसार या राशीच्या लोकांनी सूर्याला जल अर्पण केल्याने आणि पिवळा रंगाचा वापर केल्याने फायदा होतो.

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांचा स्वभाव गंभीर स्वरूपाचा असतो. त्यांना अस्थिरता तितकी पसंत नसते. या लोकांचे मन स्थिर आणि स्वभाव शांत असल्याने लक्ष एकाग्र करण्यात यांना फारसा प्रयत्न करावा लागत नाही. या लोकांच्या स्वभावातच विश्वासहर्ता असते. कोणतेही काम करताना यांना इतरांवर अवलंबून राहणे पसंत नसते. हे लोक कामाच्या ठिकाणी लोकप्रिय असतात. मात्र या लोकांनी तामसिक भोजन करणे टाळावे. तसेच यांच्यासाठी निळा आणि पांढरा रंग शुभ असतो.

मिथुन

मिथुन राशीचे लोक शांत स्वभावाचे असतात. या राशीच्या लोकांचे मन लवकर एकाग्र होते. मात्र काही वेळी दुहेरी मनस्थितीमुळे त्यांचे लक्ष भरकटत असते. या लोकांना आपल्या जवळच्या व्यक्तींशी गप्पा मारायला प्रचंड आवडते. संयमी स्वभावामुळे अनेक लोक यांच्याकडे आकर्षित होतात. मात्र द्विदा मनस्थितीपासून बचावासाठी या राशीच्या लोकांनी आकाशी रंग आपल्या वापरात जास्तीतजास्त आणला पाहिजे. शिवाय सतत बडीशोप खाणे लाभदायक ठरते.

कर्क

कर्क राशीचे लोक अस्थिर स्वभावाचे असतात. या लोकांना फार वेळ एका ठिकाणी राहणे आवडत नाही. त्यामुळे त्यांना सतत गोष्टीमध्ये नावीन्य हवे असते. मात्र अध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींमध्ये या लोकांचे मन पटकन एकाग्र होते. हे लोक अत्यंत दयाळू स्वभावाचे असतात. दुसऱ्यांच्या मदतीसाठी हे लोक धावून जातात. या लोकांसाठी भगवा रंग फायदेशीर ठरतो. शिवाय रोजच्या आहारात दुधाचे सेवन केल्याने लाभ होतो.

सिंह 

सिंह राशीचे लोक प्रामुख्याने कलाकार वृत्तीचे असतात. या राशीच्या लोकांना सतत प्रसिद्धीत राहायला आवडते. त्यामुळे अनेक कलाकारांची रास सिंह असल्याचे दिसून येते. या लोकांना मनमोकळेपणाने आयुष्य जगायला आवडते. यांना सतत फिरायला जायला, मित्रांसोबत पार्ट्या करायला आवडते. मात्र हे लोक सतत उतावळेपणाने वागतात. त्यामुळे बऱ्याचवेळी हातातील संधी सोडून देतात.

कन्या

कन्या राशीचे लोक अतिशय काटेकोर स्वभावाचे असतात. या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात नीटनेटकेपणा हवा असतो. हातात घेतलेल्या कामात हे लोक अतिशय बारकाईने लक्ष देऊन पूर्णत्वास नेतात. या लोकांचा स्वभाव काळजीवाहू आणि दयाळू असतो. या राशींचे लोक मुख्यत्वे मदतनीस, नर्स, केअरटेकर असतात. तसेच या राशीच्या काही लोकांमध्ये लिखाणाची सुप्त कला असते. असे लोक लेखन क्षेत्रात खूप नावलौकिक मिळवतात.

तूळ

तूळ राशीचे लोक अतिशय अभ्यासू आणि हुशार असतात. या लोकांना वैचारिक चर्चेत प्रचंड स्वारस्य असते. या राशीचे लोक कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्यांचा सखोल अभ्यास करण्यावर भर देतात. या लोकांना जास्तीत जास्त लोकांच्या सानिध्यात राहणे आवडते. तूळ राशीचे लोक अतिशय समाजशील आणि मनमिळाऊ असतात.

धनु

धनु राशीचे लोक अत्यंत मोकळ्या मनाचे आणि विनोदी बुद्धिमत्तेचे असतात. या लोकांना मजामस्ती करणे पसंत असते. या लोकांना राग फार कमी येतो. या लोकांना एखाद्या गोष्टीत प्रचंड कुतूहल असते. त्यामुळे हे लोक सतत एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतात. मात्र या लोकांमध्ये एक दुर्गुण आहे. या लोकांना दिलेले वचन पाळता येत नाही.

मकर

मकर राशीचे लोक अत्यंत संयमी आणि शिस्तप्रिय असतात. या लोकांना चंचलपणा अजिबात रुचत नाही. कोणतेही काम हातात घेतल्यास ते काळजीपूर्वक पूर्ण केल्याशिवाय यांना चैन पडत नाही. शिवाय एखादे काम करण्यापूर्वी त्याचे उत्तम नियोजन करुन कामाला सुरुवात करतात. त्यामुळे या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय रुबाबदार आणि प्रभावी दिसते.

कुंभ

कुंभ राशीचे लोक वैचारिकदृष्ट्या अत्यंत उत्तम असतात. या लोकांना प्रत्येक गोष्टींमध्ये बारकाईने विचार करणे पसंत असते. कुंभ राशीचे लोक सतत इतरांचा विचार करत असतात. त्यांना प्रत्येक व्यक्तीबद्दल आपुलकी आणि प्रेम वाटते. या लोकांचा स्वभाव काहीसा लाजरा असतो. मात्र आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये हे लोक फारच मोकळेपणाने वावरतात.

मीन

मीन राशीचे लोक दयाळूवृत्तीचे असतात. असे लोक कोणत्याही परिस्थितीत इतरांना मदत करायला पुढे येतात. या लोकांना वास्तवाशी घेणंदेणं नसतं. असे लोक आपल्याच जगात वावरत असतात. त्यांना गाणी ऐकायला फार आवडते. तसेच त्यांचा स्वभाव मुळातच रोमँटिक असतो. त्यामुळे त्यांची प्रेम जीवन उत्तम असते.

WhatsApp channel