Sinh Kanya Tula Vrishchik 4 June 2024 : आज चंद्र भरणी नक्षत्रमधून कृतिका नक्षत्रामध्ये संक्रमण करणार आहे. त्यामुळे अत्यंत शुभ अशा धनयोगाची निर्मिती होत आहे. या योगात आजचा दिवस सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी कसा असणार ते जाणून घेऊया.
सिंह राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कलाकारांना कला क्षेत्रात वाव मिळेल. परंतु त्यापासून आर्थिक लाभ मात्र मिळणार नाही. योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. स्वप्नांचा संबंध वास्तवाशी लावण्याचा प्रयत्न करू नये. कामाच्या दृष्टीकोनातून दिवस त्रासदायक असणार आहे. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. कौटुंबिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगारात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा.
शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व.शुभअंकः ०५, ०९.
कन्या राशीसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. मुलांच्या आवाक्याबाहेरच्या मागण्यांमुळे वैतागून जाल. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करणे आवश्यक ठरेल. घराकडे जातीने लक्ष द्याल. स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकारवृत्तीमुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनांवर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावू शकते. आरोग्याच्याबाबतीत खर्चात वाढ होईल.
शुभरंगः हिरवा शुभदिशाः उत्तर.शुभअंकः ०३, ०६.
तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून इतरांकडून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. महत्वाच्या कार्यात कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी मुलांसोबत खेळीमेळीचे संबंध राहतील. लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे.
शुभरंगः भगवा शुभदिशाः पश्चिम.शुभअंकः ०६, ०९.
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कार्यक्षेत्रात नवीन संधी तुमच्या पदरात पडतील. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. मनात ठरवलेली एखादी गोष्ट पार पडेपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. तुम्हाला उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल.
शुभरंग: भगवा, शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०४, ०७.