मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 4 June 2024 : आज मंगळवारचा दिवस कुणासाठी लकी आणि कुणासाठी अनलकी? वाचा राशीभविष्य

Today Horoscope 4 June 2024 : आज मंगळवारचा दिवस कुणासाठी लकी आणि कुणासाठी अनलकी? वाचा राशीभविष्य

Jun 04, 2024 09:11 AM IST

Today Horoscope 4 June 2024 : चंद्र आज मेष व वृषभ राशीतून आणि भरणी नक्षत्रातून भ्रमण करणार आहे.

Today Horoscope 4 June 2024 : आज मंगळवारचा दिवस कुणासाठी लकी आणि कुणासाठी अनलकी? वाचा राशीभविष्य
Today Horoscope 4 June 2024 : आज मंगळवारचा दिवस कुणासाठी लकी आणि कुणासाठी अनलकी? वाचा राशीभविष्य

आज मंगळवार ४ मे २०२४ रोजी भौमप्रदोष आणि शिवरात्री आहे. चंद्र मेष व वृषभ राशीतून आणि भरणी नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या सर्व हालचालींमध्ये आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार हे राशीभविष्यच्या माध्यमातून जाणून घेऊया.

मेषः आज चंद्राचे भरणी नक्षत्रातील भ्रमण पाहता शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल.

वृषभः आज भौमप्रदोष दिनी धार्मिक गोष्टी करण्यासाठी बराच पैसा खर्च कराल. मात्र आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. तुमच्या चांगल्या कामाचे चांगले लाभ मिळतील.

मिथुनः आजच्या चंद्र गोचरात वैवाहिक आयुष्यात थोडी तडजोड करावी लागेल. अंगात थोडा आळस शिरेल त्यामुळे कामे उरकण्यात थोडी दिरंगाई होईल.

कर्कः आज शोभन योगात तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम ठसा निर्माण करण्यात तुम्ही वरचढ ठरणार आहात. चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील.

सिंहः आज अतिगंड योग पाहता करियरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे.

कन्याः आज बुध अस्त होत असल्याने व्यवसायात कोणत्याही मोहात न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या. इतरांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागले तरी, स्वतःच्या प्रयत्नाला महत्त्व द्यावे लागेल.

तूळ: आज उत्तम चंद्रबल लाभल्याने आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे.

वृश्चिकः आज चंद्र शुभ योगात असताना नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद अधिकच दुणावेल.

धनुः आज शोभन योगात उत्कृष्ट बुद्धीमत्ता आणि अचाट स्मरणशक्ती असल्यामुळे हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. मुळापर्यंत जाऊन अभ्यास करण्याची वृत्ती आणि मुडी स्वभाव यामुळे तुम्ही जरा इतरांच्या नजरेत भराल.

मकर: आज चंद्रबल उत्तम असल्याने लोकांना संघटित करण्याबाबत विशेष रूची ठेवाल. राजकारणी लोकांना आपल्या कामामध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल.

कुंभ: आज चंद्र गोचर शुभ स्थानातून होत आहे. एक प्रकारची प्रेरणा आतून निर्माण होईल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. कल्पनाशक्ती आणि दूरदर्शीपणाच्या जोरावर लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल.

मीनः आज चंद्रबल उत्तम असल्याने नोकरी व्यवसायात मनासारख्या गोष्टी घडतील. त्यामुळे आरोग्य उत्तम राहील. कामात धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल.

WhatsApp channel
विभाग