आज शुक्रवार २८ एप्रिल रोजी, चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी तिथी असून, मूळ नक्षत्र आणि शिव योग आहे. आज चंद्र धनु राशीत संक्रमण करणार आहे. कौलव करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!
आज खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. जुनी मित्रमंडळी भेटतील. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराट होऊ शकते, धनलाभ होईल. आर्थिक प्रगतीचा दिवस ठरेल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल.
आज प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. कंटाळा न करता कामाला लागा. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. मनःस्वास्थ्य हरवून बसाल. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आज राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. गुंतवणूक करायला हरकत नाही. भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. पद प्रतिष्ठा लाभेल.
आज झोपेची तक्रार राहील. व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. कामचुकारपणा करू नका. शक्यतो प्रवास टाळा.
आज जुनी येणी वसूल होतील. कष्ट खूप करावे लागले तरी यशाचा मार्गही दृष्टीक्षेपात असल्यामुळे कष्टाचे काही वाटणार नाही. कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम रहाणार आहात. घरात वेळ देऊ शकणार नसल्यामुळे मनावर थोडा ताण येईल. अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील. कामे पुर्णात्वास जातील.
आज अडचणी सोडवाल. सगळ्या अडचणीवर मात कराल. तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहील.
आज कौटुंबिक वातावरण निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनी मित्रांपासून दुर रहा. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा.
आज गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. प्रेम प्रकरणात यश येईल. विवेक ठेऊन वेळीच सावध राहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे.
आज मन प्रसन्न राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल.
आज महत्त्वाची कामे रखडतील. व्यवसायात एखादी योजना रद्द करावी लागेल. नोकरी व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धैर्याने आणि संयमाने काम करा. मोठी गुंतवणूक करू नये. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकरिता अनिष्ट दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. मोठी गुंतवणूक करू नका. घरातील स्वास्थ्य टिकवण्याचा प्रयत्न कराल.
आज वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. मुलांच्या अभ्यासाविषयी जास्त लक्ष घालावे लागेल. तापटपणाही वाढेल. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. सकारात्मकता वाढेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. नावलौकिक वाढेल. वडिलोपार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील.
आज खर्चाचा आकडा वाढल्यामुळे ताण वाढेल पण पैसे मिळणार आहेत. कोणालाही उसने पैसे देण्याचे टाळावे. कोणाला जामीनही राहू नये. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. मनस्ताप करावा लागेल. व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून राहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा.
संबंधित बातम्या