Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : आजच्या दिवशी चंद्र केतुशी युती योग तर गुरू हर्षलशी नवमपंचम योग करत आहे. तसेच आज ग्रहणयोग आणि गजकेसरीयोगसुद्धा निर्माण होत आहे. या योगांचा परिणाम आज दिवसभर मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशींवर कसा होणार? व्यवसायात लाभ होणार की नाही? लव्ह लाईफ बहरणार की नाही? या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया.
आज तुम्हाला प्रसिद्धीचे योग येतील. कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी निर्माण होतील. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य आयोजित कराल. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे.
शुभरंग: नारंगी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०४, ०६.
राजकारणात भावनेपेक्षा बुद्धीच्या कसरतीचा उपयोग जास्त होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल. पूर्वी मांडलेले आर्थिक आडाखे सफल होतील. नवीन धोरण योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल.
शुभरंग: गुलाबी शुभदिशा: पश्चिम.शुभअंकः ०६, ०९.
व्यवसाय नोकरीत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. मोठ्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताणतणात्मक राहिल. उद्योग धंदयात लक्ष कमी होईल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. व्यापारात सामंजस्य पणाची भूमिका घ्यावी. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे.
शुभरंगः पोपटी शुभदिशाः उत्तर.शुभअंकः ०६, ०८.
आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तितकेच वाढतील. अध्यात्मिक प्रगती साधाल. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक गती आणि नेमकेपणा राहिल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. देवधर्म पूजापाठसारखे धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य.शुभअंकः ०४, ०८.
संबंधित बातम्या