मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik : सिंह राशीला परदेशवारीचा योग! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik : सिंह राशीला परदेशवारीचा योग! वाचा चारही राशींचे भविष्य

HT Marathi Desk HT Marathi
Jun 14, 2024 10:10 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 14 June 2024 : रवी आणि बुध गोचरमध्ये आजचा दिवस सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी कसा जाणार त्याबाबत पाहूया.

Sinh Kanya Tula Vrishchik : सिंह राशीला परदेशवारीचा योग! वाचा चारही राशींचे भविष्य
Sinh Kanya Tula Vrishchik : सिंह राशीला परदेशवारीचा योग! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज शुक्रवारच्या दिवशी रवि आणि बुध राशीपरिवर्तन करत मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. ग्रह-नक्षत्रांच्या या स्थान बदलातून अनेक शुभ-अशुभ योगांची निर्मिती होत आहे. यामध्ये आजचा दिवस सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी कसा जाणार ते जाणून घेऊया.

सिंह

नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील. कामाच्या ठिकाणी अनेक सुधारणा कराल त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. परंतु हातात पैसे मिळायला थोडा वेळ लागेल. यशाचा आनंद मिळणार आहे. तुमच्या इच्छाआकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. जोडीदाराचा सल्ला त्यांचे वर्चस्व मान्य करावे लागेल. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल.

शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व.शुभअंकः ०१, ०९.

कन्या

नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे थोडा ताण राहील. व्यवसायात मात्र स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. तरुणांना प्रेम आणि कर्तव्य यामध्ये पेचात टाकणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अपेक्षित कार्य पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. जाहिरात मीडिया क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची अनुकूलता लाभेल. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

शुभरंगः हिरवा शुभदिशाः उत्तर.शुभअंकः ०३, ०६.

तूळ

आज घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल. विवाहेच्छूना आपला साथीदार निवडण्याची संधी मिळेल. कला आणि बुद्धी यांचा संगम होऊन खूप चांगल्या कलाकृती तयार कराल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहेत. तुम्हाला नवीन वाहन खरेदीचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मनमिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल.

शुभरंग: गुलाबी शुभदिशा: पश्चिम.शुभअंकः ०६, ०९.

वृश्चिक

व्यवहारात तुमची मते स्पष्टपणे मांडायला घाबरू नका. लाबंच्या प्रवासाचे योग येतील. परंतु प्रवासामध्ये प्रकृती व चीजवस्तूंची काळजी घ्यावी. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहिल. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. घरातील वरिष्ठ मंडळी विशेषत आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लागणार आहे. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठया अधिकाराची नोकरी मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल.

शुभरंगः केसरी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०३, ०६.

WhatsApp channel
विभाग