Today Horoscope 14 June 2024 : सिद्धी योगात मिथुन-कर्क राशी फायद्यात, तुमचं काय? वाचा आजचे राशीभविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 14 June 2024 : सिद्धी योगात मिथुन-कर्क राशी फायद्यात, तुमचं काय? वाचा आजचे राशीभविष्य

Today Horoscope 14 June 2024 : सिद्धी योगात मिथुन-कर्क राशी फायद्यात, तुमचं काय? वाचा आजचे राशीभविष्य

HT Marathi Desk HT Marathi
Published Jun 14, 2024 09:52 AM IST

Today Horoscope 14 June 2024 : वज्र योगात आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा जाणार? वाचा राशीभविष्य आज (१४ जून) सिद्धी योगात राशीचक्रातील बारा राशींसाठी दिवस कसा जाणार पाहूया.

Today Horoscope 14 June 2024 : वज्र योगात आज गुरुवसिद्धी योगात मिथुन-कर्क राशी फायद्यात, तुमचं काय? वाचा आजचे राशीभविष्य
Today Horoscope 14 June 2024 : वज्र योगात आज गुरुवसिद्धी योगात मिथुन-कर्क राशी फायद्यात, तुमचं काय? वाचा आजचे राशीभविष्य

आज शुक्रवार १४ जून २०२४ रोजी दुर्गाष्टमीचा चंद्र अहोरात्र सिंह आणि कन्या राशीतून तर उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातून गोचर करणार असून सिद्धी योग व विष्टी करण घटित होत आहे. या सर्वांमध्ये आजचा दिवस १२ राशींसाठी नेमका कसा असणार हे राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया.

मेष : आज गजकेसरी योगात कामाचे नियोजन उत्तम केल्यास यश मिळेल. व्यवसायात एखादे काम मिळण्याच्या मागे असाल तर उच्चपदस्थ लोकांच्या मध्यस्थीने कामे लवकर होतील. धंद्यातील कामे अंतिम टप्प्यावर जाऊन पोहोचतील.

वृषभ : आज चंद्रभ्रमण शुभ स्थानातून होत आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. घरातील वातावरण सुधारेल. विद्यार्थ्यांनी कोणताही अविचार करू नये. नोकरीत अधिकार मिळेल.

मिथुन : आज सिद्धी योगात तुमची वृत्ती आनंदी असली तरी कोणी तुमच्याशी स्पर्धा करीत आहे असे जाणवल्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुमचे कोणतेही काम एका हेलपाट्यात होणार नाही. त्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील.

कर्क :  आज चंद्राचे गोचर विशेष लाभदायक ठरणार आहे. तुमच्यासमोर शत्रूंचे काही चालणार नाही. प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल. इतरांना सल्ले देण्यात आणि इतरांच्या वर्तनात कशी सुधारणा हवी हे समजवण्यात पुढे रहाल.

सिंह : आज चंद्राशी होणारा इतर ग्रहांचा योग पाहता ग्रहांची अनुकूलता आहे. तुमच्यामधील धडाडीचा मात्र फायदा होईल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावेत.

कन्या : आज विष्टी करणात प्रचंड बुद्धीमत्ता असूनही स्वतःचे प्रश्न सोडवताना मनाचा गोंधळ उडेल. काही घरगुती गोष्टींमुळे अस्वस्थता वाढेल.

तूळ : आज चंद्रबल शुभ राहिल्याने प्रबळ आत्मविश्वास आणि परिस्थितीचा अचूक अंदाज तुमच्या कामाचा दर्जा सुधारून टाकेल. ऐषारामी आयुष्य जगावे असे वाटेल.

वृश्चिक :आज केतु आणि चंद्र यांचा योग होत आहे. त्यामुळे खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. भाग्याची साथ चांगली मिळेल. तुमच्या मनातील गोष्टी पूर्ण होण्याच्या मार्गावर राहतील.

धनु : आज सिद्धी योगात तुमच्या अत्यंत सौम्य व शांत स्वभावाचा फायदा कोणी घेत नाही ना याकडे लक्ष द्या. घरामध्ये कोणाच्याही आजारपणासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.

मकर : आज चंद्रबल अनुकूल राहिल. व्यवसायात नुसते ज्ञान असून चालणार नाही तर ते कोणत्या पद्धतीने वापरावे याचाही अभ्यास करावा लागेल. व्यवसायात कोणत्या गोष्टी केल्या असता आपली प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करा.

कुंभ : आज चंद्र केतुशी योग करत आहे. थोडा तापट स्वभाव सगळ्यावर पाणी पाडू शकतो. घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. व्यवसायात परिस्थितीचा साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावा.

मीन : आज ग्रहयोग अनुकूल आहेत. नोकरी व्यापारात सरकारी कामकाजामुळे काही कामे अडली असतील तर ती पूर्ण होतील. काही सवलती मिळायच्या असतील तर त्या मिळून जातील.

Whats_app_banner