मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik: वृश्चिक राशींच्या लोकांना मिळणार कलाक्षेत्रात झळकण्याची संधी! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik: वृश्चिक राशींच्या लोकांना मिळणार कलाक्षेत्रात झळकण्याची संधी! वाचा चारही राशींचे भविष्य

Jun 01, 2024 08:39 AM IST

Sinh Kanya Tula Vrishchik Rashi Bhavishya:आज शनिवारच्या दिवशी चंद्र राहू आणि नेपच्यूनशी युतीयोग करत आहे. या युतीचा परिणाम राशींवरसुद्धा होणार आहे.

 वृश्चिक राशींच्या लोकांना मिळणार कलाक्षेत्रात झळकण्याची संधी! वाचा चारही राशींचे भविष्य
 वृश्चिक राशींच्या लोकांना मिळणार कलाक्षेत्रात झळकण्याची संधी! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik Rashi Bhavishya : आज जूनच्या पहिल्याच दिवशी ग्रह-नक्षत्रांमध्ये महत्वाचे बदल दिसून येत आहेत. आज चंद्र राहू आणि नेपच्यूनशी युतीयोग करत आहे. तर दुसरीकडे अस्त गुरुचा उदय होणार असून मंगळ ग्रह आणि हर्शल मेष आणि वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. या संक्रमणाचा परिणाम राशींवरसुद्धा पडणार आहे. त्यामुळेच आजचा दिवस सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी कसा जाणार हे जाणून घेऊया.

 

सिंह

आज प्रीती योगात सिंह राशीच्या लोकांसाठी उत्तम दिवस असणार आहे. कोणत्याही प्रश्नाची उकल तुमच्याकडून फार चांगली होत असल्यामुळे अनेक लोकांचे सल्लागार बनाल. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण होतील. त्यामुळे लोकांचा तुमच्यावरील विश्वास अधिक घट्ट होईल. नवीन योजनेचा शुभारंभ होण्याचा योग आहे. व्यवसायात यश मिळेल. मिळकतीच्या अनेक नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. नोकरदार पत्नीकडून आर्थिक सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होऊन मिळकतीत वाढ होईल. मात्र खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. दूरवरचे प्रवास आनंददायक ठरतील.

शुभ रंगः लाल 

शुभ दिशाः पूर्व

शुभ अंकः ०१, ०५.

Today Horoscope 1 June 2024 : आज गुरुचा उदय महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोणासाठी ठरेल लाभदायक? वाचा राशीभविष्य

 कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे.  जोडीदाराबरोबर मतभेद झाले तरी कोणतीही टोकाची भूमिका न घेणेच सोयीचे राहील. आयत्या वेळच्या खर्चासाठी मात्र तरतूद करून ठेवावी लागेल. गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. नोकरीत नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही. दिवस दगदगीचा आणि धावपळीचा राहील. वडिलांच्या तब्बेतीची विशेष काळजी घ्या. अपूर्ण राहिलेली कामे आज पूर्ण कराल.  निरर्थक कामात वेळ वाया घालवू नका. स्थावर मालमत्तेत काही अडचण येण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरी कायदयाचे वाद असतील तर समोपचाराने मिटवा. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

शुभ रंगः हिरवा 

शुभ दिशाः उत्तर 

शुभ अंकः ०२, ०६.

 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत अनुकूल दिवस आहे. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या आज दूर होतील. कोणाचाही द्वेष तिरस्कार करू नका. नवीन योजना फायदेशीर ठरतील. व्यापारात एखाद्या नवीन भागीदारासोबत संबंध प्रस्थापित कराल. गृहसौख्यात जोडीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगति होईल. बेरोजगारांना चांगल्या पगाराच्या नोकरीचे योग आहेत. आपला नावलौकिक सांभाळण्याचा प्रयत्न करावा. कलाकारांना योग्य संधी मिळतील. कलागुणांची वाहवाह होईल.

शुभ रंगः गुलाबी 

शुभ दिशाः पश्चिम

शुभ अंकः ०२, ०७.

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : प्रीती योगात वृषभ राशीच्या लोकांना भावंडांकडून होणार धनलाभ!

वृश्चिक

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींना स्वकर्तुत्व सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ आज नक्की मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारवर्गासाठी व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. व्यवसायात मनासारखे यश मिळाल्याने आनंदी रहाल. नोकरीत तुम्ही घेतलेले निर्णय भविष्याच्यादृष्टीने योग्य राहतील. संगीतकार व गायक, वादक यांना चांगली संधी मिळेल. शेअर्स मार्केटमधील गुंतवणूकीसाठी उत्तम दिवस आहे. मात्र मनातील शंका दूर ठेवाव्या लागतील. मुलांच्या बाबतीत आनंदाची बातमी मिळेल.

शुभ रंगः तांबूस 

शुभ दिशाः दक्षिण

शुभ अंकः ०७, ०९.

WhatsApp channel