Raksha Bandhan 2024 Numerology : अंकशास्त्रात संख्यांना खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख त्याच्या जीवनात आनंद आणि सौभाग्य आणण्यासाठी महत्वाची ठरू शकते. अंकशास्त्रात, मूलांक आणि भाग्य संख्या म्हणजेच भाग्यांक एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या तारखेच्या गणनेनुसार ठरवली जाते. हा अंक एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलण्यासाठी महत्वाचा मानला जातो. अंकशास्त्रानुसार तुमचा मूलांक शोधण्यासाठी तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष यांची गणना करा आणि जो अंक येईल तो तुमचा भाग्यांक असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असेल.
सोमवार १९ ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या भावाच्या मनगटावर त्याच्या मूलांकानुसार खास राखी बांधू शकता, जेणेकरून तुमच्या भावाच्या आयुष्यात फक्त आनंदच येईल आणि त्याच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जाणून घ्या जन्मतारखेनुसार भावाच्या मनगटावर कोणती राखी बांधावी.
जर भावाचा वाढदिवस १, १०, १९ तारखेला असेल तर तुम्ही त्याला लाल रंगाची राखी बांधू शकता. भावासाठी हे खूप भाग्यवान सिद्ध होऊ शकते.
जर तुमच्या भावाची जन्मतारीख २, ११, २० किंवा २९ असेल तर तुम्ही तुमच्या भावाच्या मनगटावर रुद्राक्षाची राखी बांधू शकता. यामुळे मूलांक २ असलेल्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा असेल.
ज्यांच्या भावाचा वाढदिवस ३, १२, २१ आणि ३० तारखेला आहे, त्यांना तुम्ही पिवळ्या रंगाची राखी बांधू शकता. पिवळा रंग विष्णू देवाला प्रिय असल्यामुळे विष्णू देव प्रसन्न होतील.
ज्या लोकांच्या भावाची जन्मतारीख ४, १२, २२ आणि ३१ तारखेला आहे त्यांनी त्यांच्या राखीमध्ये ॐ चिन्ह घ्यावा आणि ही राखी बांधावी.
जर तुमच्या भावाची जन्मतारीख ५, १४ किंवा २३ असेल तर तुम्ही तुमच्या भावाला हिरवी राखी बांधू शकता.
तुमच्या भावाची जन्मतारीख ६, १५ किंवा २४ असेल तर भावाला कोणत्याही रत्नाची राखी बांधावी यामुळे सुख-समृद्धीची भरभराट होईल.
जर तुमच्या भावाची जन्मतारीख ७, १६ किंवा २५ असेल तर तुम्ही त्याला रेशीम धाग्याची किंवा पिवळ्या रंगाची राखी बांधू शकता.
जर तुमच्या भावाची जन्मतारीख ८, १७ आणि २६ असेल तर तुम्ही त्याला चांदीची किंवा पिवळी राखी बांधू शकता.
तुमच्या भावाची जन्मतारीख ९, १८ आणि २७ असेल तर तुम्ही त्यांना लाल रंगाची राखी बांधा, यामुळे जीवनात आनंदाची कमी नाही राहणार.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)